चाकणचा सुपुत्र महाराष्ट्राचा अभिमान. मराठी माणसाची धनदौलत साठवणारा, तुकोबाचा शिष्य संताजी जगनाडे आपल्या पंढरीस जात आहे. जाता जाता आपल्या जन्मभूमीला भेटत आहे. ही भेट अविस्मरणीय ठरावी हा लोकमानस चाकणकर मंडळी टाळमृदंग घेऊन चाकणबाहेर आली. आली आली म्हणेपर्यंत संताजींची पालखी चाकणच्या शिवेवर आली. चाकणकरांचा आनंद शब्दांत मावत नव्हता. हर एकाने या भूमीच्या सुपुत्रांचे दर्शन घेतले मग संताजीचा गजर टाळ-मृदंगात करीत देहभान हरपून नाचत बागडत गावात निघाली
पुन्हा पालखी पांडुरंगाच्या देवळातून गावाबाहेर निघाली. फाट्यापर्यंत अभंगाचा गजर करीत गावकरी आले. या फाट्यावर निरोप दिल्यावर बाकी उरले पाच सहा लोक. ही मोजकी पण निवडक त्यागाची, जिद्दीची निष्ठेची माणसे उरली. जाणारी येणारी विचारीत जरा थांबत एवढीच माणसे म्हणुन चालू लागत. पण ही माणसे खचली नाहीत. दमली नाहीत. हरली नाहीत की पुन्हा परतली नाहीत. वरून पडणारा पाऊस अंगावर घेत चाकण जवळ करीत होती.
यावर दादा व राऊतांनी विचारविनिमय केला. पालखी ही समाजाची आहे आपणा दोघांची नाही पण तरीसुद्धा सुरूवातीला कोणीच सहकार्य करणार नाही. तेव्हा जो खर्च होईल तो दोघांनी निम्मा निम्मा सोसावा. आणि पालखी सुरू करताना येणार्या अडचणी यावर विचारविनिमय झाला. पालखीसाठी बैल, रथ व पालखी या गोळा करण्याची जबाबदारी दादांनी घेतली. पालखी मावळात एका खेडेगावात होती. बरडचे अर्जुनशेठ यांची गाडी पुण्यात आली होती.
‘‘ मी रत्नाकर भगत बोलतोय. हे बघा रात्री जो प्रकार घडला तो घडावयास नको होता. पण समाजाच्या विचाराला अनुसरून मला थांबावे लागले. आपण गेल्यानंतर रात्रभर मला या गोष्टीने चैन पडले नाही. यावर साधकबाधक विचार केला. रात्री मीही हिरिरीने बोलणे गरजेचे होते. याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. रात्री आपण म्हणता त्या मार्गाने पालखी काढू. त्यासाठी कडक होण्याची तयारी आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. ‘‘ दादा
त्यासाठी दादांनी लोकांना कळवावे. यानंतर सकाळ पेपरमध्ये संत संताजी पालखीसंबंधी जाहिरात द्यावी. सकाळमध्ये जाहिरात घेऊन दादांनी समाजाची बैठक बोलविली. त्या दिवशी त्या बैठकीला समाजातील पुण्यातील प्रतिष्ठित तीस एक लोक हजर होते. यात लष्करमधील सर्वश्री प्रधान, ताराबाई सुपेकर, अंबादास शिंदे, व्यवहारे बाबा, रामचंद्र शेजवळ, तळेगाव दाभाडे येथील बाळासोा बारमुख आणि इतर मंडळी हजर होती.