Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्था, जळगाव
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. 16/12/2017 शनिवार दि. 17/12/2017 रविवार रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व समज बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आसे आव्हान करण्यात आले आहे.
तेली समाजातील तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण
औरंगाबाद - तेली युवा संघटना, सकल तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज जयंतिनिमित्त गुरवारी (ता. आठ) सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रेत तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण
संताजी जगनाडे महाराजांनी दिली कर्तव्याची शिकवण उपदेशांवर समाजोत्थानाचे कार्य सुरू
नागपूर : संताजींचा विवाह बाराव्या वर्षी झाला. संसार करतानाही त्यांचे मन मात्र योग्य गुरूसाठी तळमळत होते. दोन अपत्य झाल्यावर एका कीर्तनाच्या निमित्ताने त्यांची संत तुकाराम महाराजांशी भेट झाली. संत तुकारामांचे ते शिष्य झाले. महाराजांच्या १४ टाळकर्यांमध्ये संताजी प्रमुख होते.
नागपुर नंदनवन येथे संत जगनाडे महाराज यांचे स्मारक तयार करण्यात आले. संताजींचे कार्य आणि उपदेश सातत्याने समाजाच्या समोर राहावा आणि त्यांच्या विचारांवर जगण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. विठ्ठलराव खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. संताजींच्या हातात लेखणी आहे आणि ते लिहित असल्याचे दृश्य साकारणारा हा पुतळा संपूर्ण भारतात एकमेव आहे.
नागपुर - प्रत्येक जातीत साडेबारा उपशाखा असतात. जातीभेद आणि त्यानंतर शाखांमधील भेदांनी समाज अधिक विखुरतो. संत जगनाडे महाराजांनी जातीप्रथेचाच निषेध नोंदविला होता. किमान जातीमधील उपशाखांमध्ये संघर्ष नसावा म्हणून समता परिषद कार्य करते.