Sant Santaji Maharaj Jagnade
पेठ येथे श्रीकृष्णांनी वेधले लक्ष
पेठ नाशिक तेली समाज - हरसूल व पेठ येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
संताजी महाराज यामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण बापू महाराज गिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भाविकांकडून करण्यात आले. सायंकाळी संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या प्रतिमेची सजवलेल्या महान आतून टाळमृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
घोटी : डीजे, डॉल्बी, तसेच वाद्य संस्कृतीला फाटा देत गणेश विसर्जन सोहळ्यात येथील श्री. संताजी महाराज मित्रमंडळ व तेली समाज बांधवांनी अभिनव उपक्रम राबविला. वारकरी दिंडी काढून हरिनामाचा व गणरायाचा गजर करित, तसेच महिला वर्गाने प्रबोधन रॅली काढत सहभाग नोंदवला, घोटी शहरात वर्षभर श्री संताजी मंडळाकडून व समाज बांधवांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविले जातात.
![]()
गिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.
विजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.
पूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे.
वाशिम - रिसोड येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रिसोड वाशिम शहरातील तेली समाज बांधवांतर्फे अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांच्या पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
संताजी सेनेच्या निशुल्क दिनदर्शिकेचा विमोचन सोहळा थाटात संपन्न
अकोला तेली समाज - दि 6 जानेवारी 2018 रोजी संताजी सेनेच्या दिनदर्शिकेचे विमोचन समाजाच्या जेष्ठ आणि मार्गदर्शक मंडळीच्या उपस्थितीत राठोड पंच बंगला शिवाजी नगर येथे झाले या प्रसंगी संताजी सेना मार्गदर्शक मा.श्री.सुधाकरजी झापर्डे,मा.श्री.रमेशजी गोतमारे,मा.श्री.गोपालजी भिरड,मा.श्री.अरविंदजी देठे,