वायगांव (नि.) ता. जि. वर्धा. येथिल नियोजीत श्री. संत संताजी जगनाडे महाराज नियोजीत सभागृह जागेवरिल काटेरी कुंपना व भुमीपुजन हास्ते मा. खा. श्री. रामदासजी तडस, मा. श्री. सुरेशभाऊ वाघमारे , मा. श्री. मिलींदभाऊ भेंडे, मा. श्री. प्रविण काटकर, मा. सौ. ज्योत्स्नाताई मंगरुळकर, मा. श्री. दामोदरराव पाटील, मा. श्री. नमोहरराव घोडखांदे मा. श्री. संभाजी महाकाळकर, मा. श्री. डॉ. प्रदिपजी घोडखांदे, मा. श्री. बाबाराव घोडे, मा. श्री. बाळकृष्णजी मंगरुळकर, मा. सौ. शकुंतलाबाई मंगरुळकर, मा. श्री. केशवराव हिंगे, श्री. नानाजी ढोले श्री. हेमंतभाऊ मंगरुळकर श्री गणेशभाऊ वांदाडे श्री. गणेशभाऊ देवतळे, श्री. गजुभाऊ रेवतकर, व गावातील सर्व समाज बांधव
श्री. संताजी प्रतिष्ठाण, नगररोडची स्थापना होऊन पहिली मिटींग दि. १/०३/२०१५ रोजी चंदननगर पुणे. येथे पार पडली. मिटींगमध्ये खालील कार्यकारीणीची सर्वानमुते निवड झाली.
संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबाशेठ व आई सुंदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेल धंद्याचा परिचय करूण दिला. व लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबाच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दिर्घ आजाराने वारल्या. संताजीला किर्तनात पहाताच तुकारामाना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजी बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजीला आपल्या सानिध्यात ठेवले.
कोथरूड येथील शुभेच्छा मंगल कार्यालयात श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने नुकताच तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २०१५ दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध समाजिक उपक्रम राबविले जाता.
आशा जागृत तालुक्याची जबाबदारी श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे श्री. किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे यांच्याकडे आली. श्री. दुर्गुडे यांनी तालुक्यातील परंपरेला साजेसे कार्य सुरू केले. सलग दोन वर्ष विद्यार्थी गुण गौरप समारंभ घेऊन संघटन जिव्हाळा निर्माण केला. या बळावर ते खाने समुरी करू लागले.