Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संत संताजी पालखी सोहळ्याचे कै. साधु शेठ हे संस्थापक सदस्य. अगदी सोहळा सुरू झाला. तेंव्हा सहकार्य कमी होते. काही कुचेष्ठा ही करीत. यावर मात करीत त्यांनी सर्वा बरोबर उभे होते. आज जो सोहळ्याला भव्य दिव्य पणा आला त्यात त्यांचा त्याग महत्वाचा आहे. चास, ता. खेड, या गावातुन ते यात सहभागी होत. त्यांचे चिरंजीव श्री. विष्णूपंत सहादू घाटकर यांनी पंढरपूर येथे स्वयंपाक घराच बांधकाम करून दिले आहे.
वधु-वर मेळावे काळाची गरज म्हणुन मेळावे सुरू नव्हते. किंवा आजच्या सारखी वधु-वर मेळाव्या ही गोरख समाज सेवा अस्तीत्वात नव्हती. तेव्हां विस्कळीत समाजात कै. शंकरराव कर्डीले उभे होते. गणेश पेठेत ते घर चालविण्यासाठी धडपडत. बाकीचा सर्व वेळ समाज कार्यालयात जात असत. खुर्चीच्या मागे न लागता तेथे येणार्या वधु-वर पालकांच्या संपर्कात रहात. शहरातील व आजुबाजुच्या समाजाच्या लग्न समारंभात हाजर आसत. त्या ठिकाणी येणार्या बांधवांना ते जवळ करीत आणी वधुवरांची लग्न जमवुन देत. या साठी पदर मोड ही त्यांनी केली.
संत शिरोमणीतुकाराम महााजांच्या अगोदर पासून चालु असलेली पंढरपूरी वारी सर्व भगवतभक्त वारकर्यांना दरवर्षी या आनंद सागरात यथेच्छ आनंदाने भक्ती रसात डुंबायला मिळते. वारीसाठी तो वयाचा विचार न करता त्यात तन मन धन अर्पुण सामिल होतो. चातका प्रमाण तिची वाट पहातो. त्या वारीचा आनंद काही वेगळाच असतो.
हेचि व्हावी माझी आसा ॥
वारी चुको नेदी हरी ॥
संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर जाणार्या आमच्या समाज बांधवांना श्री संत संताजी महााजांचीही पालखी सोहळा असावा अशी मनाेेमन तळमळ होती. कै. धोंडीबा राऊत, कै. रत्नाकर दादा भगत, कै. शरद देशमाने, कै. रावसाहेब पन्हाळे व कै. अर्जुनशेठ बरडकर यांच्य निश्चयातुन 1978 साली सोहळा सुरू झााला. पुणे परिसरातील अनेक महाराजांवर श्रद्धा असणार्य भक्त मंडळींनी आप आपल्या परीने पालखी सोहळा वृध्दींगत होण्यासाठी हातभार लावलेला आहे.
वाकड येथिल समाजबांधव श्री. रामहरी चिलेकर हे एक शेतकरी कुटूंबातील बांधव कै. ज्ञानोबा तुकाराम व मातोश्री सुशीला ज्ञानोबा चिलेकर या आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल. आपण समाजाचे दे लागते ते आपण दिलेच पाहिजे ही प्रणली रूजलेली याच मुळे ते समाजाच्या विविध उपक्रमा सक्रीय सहभाग घेतात त्यांचे नातलग बंडोपंत शेलार व श्री काळूशेठ शेजवळ यांच्या सानिध्यात सामाजीक निष्ठा प्रबळ झालेली. मला काही तरी करावयाचे आहे ही प्रणाली यांच्याकडे आहे ही बाब श्री संत संताजी पालखी सोहळ्याच्या पदाधीकार्यांच्या नजरेस आली त्यांनी विनंती केली तेंव्हा श्री रामहरी ज्ञानोबा चिलेकर यांनी पंढरपुर येथिल समाज वास्तु सोर सुमारेदिड लाख रूपयांचे बांधकाम वडीलांच्या स्मरणार्थ बांधुन दिले. या साठी श्री. संतोष, श्री. सुनिल व आई यांंनी सहकार्य केले. पालखी सोहळा संस्था या सर्वांचे आभारी आहे.
पुस्तक प्रकाशन हास्ते :- माननीय खासदार श्री. रामदासजी तडस, अ. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा
तेली गल्ली मासिक प्रकाशन हास्ते :- मा. उपमहापौर श्री. आबा बागुल, पुणे
विशेष उपस्थीती ः- श्री. जनार्दन जगनाडे, अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. अरूण काळे, अध्यक्ष पालखी सोहळा, श्री. प्रभाकर डिंगोरकर, मा. अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. अंबादास शिंदे, मा. अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. रोहिदास उबाळे, मा. उत्सव अध्यक्ष, सुदुंबरे संस्था, सर्व पदाधीकारी तिळवण तेली समाज पुणे, श्री. चंद्रकांत वाव्हळ, पु. ग्रा. तैलीक अध्यक्ष, श्री. अनुपकुमार देशमाने व वारकरी.
गुरूवार दिनांक :- 30/6/2016 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री. संत संताजी महाराज जगनाडे पुला जवळ, तिळवण तेली कार्यालय भवानी पेठ, पुणे 42 येथे संपन्न होईल.