Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
मिती ज्येष्ठ ॥7॥ सोमवार दि. 27/06/2016 ते आषाढ शु. ॥15॥ मंगळवार दि. 19/07/2016
| तिथी | वार दिनांक |
सकाळी प्रसाद व फराळ |
दुपारचा विसावा | दुपारचे प्रसाद देणार्या यजमनाचे नांव |
रात्रीचा मुक्काम |
रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| जेष्ठ वद्य 7 | सोमवार 27/6/2016 | श्री. संताजी महाराज, व श्री तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा, देहू | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे |
दिनांक 8-5/2016 या दिवशी कणकवली येथे संताजी महाराज चौकाचे नामकरण संपन्न झाले.
कणकवली तेथे समाजाच्या प्रयत्नातुन कनकवली नगर परिषदेच्या संमतीने तेली आळी येथे, मा. श्री. जनार्दन गोपाळ जगनाडे (अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे ) यांच्या शुभ हस्ते. श्री. संत शिरोमणी संताजी महाराज चौक नामकरण सोहळा पार पडला.
दिनांक ०८ जानेवारी २०१६ श्री संताजी जगनाडे महाराज ह्यांची ३१६ वी पुण्यतिथी निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, शूर्परक शाखेतर्फे शाखेचे अध्यक्ष तसेच आपल्या श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ "तेली समाज", वसई-विरार-पालघर चे कार्याध्यक्ष मा. श्री. रमाकांत वाकचौडे (बापू) ह्यांनी आज त्यांच्या नालासोपारा पश्चिम सभागृहामध्ये साजरी केली, तद्वेळी सदर कार्यक्रमास को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे कार्यकारिणी सदस्य व आपल्या मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भगवान बोरसे, सचिव श्री. वैभव झगडे, सल्लागार श्री नामदे गुरुजी, श्री जाधव सर, को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे सदस्य आणि मंडळाचे कार्यकारिणी सदस्य कु. आशिष रसाळ, श्री साखरकर साहेब, महिला अध्यक्षा सौ पुष्पा बोरसे, सौ सौंदळकर मामी, सौ साखरकर मॅडम हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
पूर्वी आमच्या आजोबाच्या काळात आमचे आजोबा गावाच्या आजुबाजूच्या परिसरातील गावे, वाड्यांमधून सावकार म्हणून प्रसिद्ध होते. आजोबाच्या काळात सुमारे १२०० एकर शेती होती. सर्व शेती पावसावर अवलंबून होती. परंतु पूर्वी पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने घरामध्ये धान्याच्या राशी लागत होत्या. आमचे घर म्हणजे १२ खण, ९६ पत्र्यांचा वाडा होता. इतक्या मोठे घर असून धान्य ठेवायला जागा पुरत नव्हती, म्हणून सुमारे १५० पोती ज्वारी तळघरात साठवून ठेवावी लागत असे.
पुणे :- येथील तिळवण तेली समाज कार्यालयात श्री. मोहन देशमाने यांनी लिहीलेल्या महाराष्ट्राची अस्मिता श्री. संत संताजी महाराज या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करिताना मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. श्री देशमाने म्हणाले, संत तुकाराम यांचे लेखनीक हा संत संताजींचा एक भाग आहे. परंतु तुकारामांनी जी सामाजिक क्रांती केली त्या क्रांतीमधील ते एक पहिले प्रमुख आहेत. ब्राह्मणशाही व मोंगलशाही यांच्या आतेरेकी वाटचालीत त्यांनी अभंग जपले व जगाला दिले हे विसरून चालणार नाहीत. समाज बांधवांना अव्हान करिताच मदतीचा पाऊस पडला यातुन आठ हजार प्रती छापल्यात. त्या समाज बांधवांना मोफत दिल्या जाणार आहेत. श्री. संत संताजी तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री. जर्नादन जगनाडे यांनी श्री. संत संताजींच्या कार्याला उजाळा येईल. श्री. मोहन देशमाने आपल्या सुदूंबरे संस्थेत प्रसिद्धी प्रमुख आहेत. त्यांनी संस्थेच्या कार्याला हे सहकार्य केले आहे. त्यांची उचित जाणीव संस्था नजीकच्या काळात ठेवेल श्री. सुंदुंबरे संस्था अध्यक्ष या नात्याने कारभार करिताना सहकार्य मिळते तद्वत काही सहकार्य करतो म्हणतात पण करित नाहीत यावर ही त्यांनी आपले विचार मांडले.