पुणे - श्री. संताजी सेनेच्या इंदिरानगर बिबवेवाडी परिसर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन जोशी, अँड. अभय छाजेड, नगरसेवक, दिनेश घाडवे, गणेश घुले उपस्थित होते.
या प्रसंगी रामदास धोत्रे, रमेश भोज, दीपा व्यवहारे, प्रीतम केदारी, राधिका मखामले, निशा करपे, कल्पना उनवने, सीमा पवार, विजय हाडके, जिवय मखामले , पोपट गंधाले, दत्तात्रय पवार, शरद पिंगळे, सुय्रकांत बारमुख, श्यामराव भगत, सुनिल राऊत जयवंत मखामले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भविष्यात तरूणांना रोजगार मिळवून देणार्या विविध योजना राबविण्याचा मानस या संताजी सेनेचा आहे. संताजी सेनेची गोपालन योजनाही सुरू आहे. समाजातील ग्रामीणा भागातून ही योजना चांगल्याप्रकारे राबविता येऊ शकते. ग्रामीण भागातील तरूणांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्याकडे गायी सांभाळण्याची क्षमता असेल, यासाठी जागा उपलब्ध असेल तर जरूर या योजनेचा लाभ घ्यावा.
श्री संताजी सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष अनिल उबाळे यांच्या मातोश्री कै. सौ. जयश्री बबन उबाळे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. संताजी सेना व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यामने आयोजित कलेल्या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ४०० गरजूंनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी १५० गरजूंनी नेत्र तपासणी करून घेतली. यातील ४ व्यक्तींची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी नाममात्र दरात चष्मे देण्यात आले.
येथील कृष्णा लॉन्स येथे आयोजित संताजी सेना राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व बेरोजगारांना ऑटो रिक्षा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. श्री संत संताजी महाराज यांची आरती होऊन प्रदेशाध्यक्ष प्रा. किशोर दादा चौधरी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. राज्य उपाध्यक्ष श्री. रामदास धोत्रे साहेब यांनी दिपप्रज्वलन करून दहा सुशिक्षित बेरोजगारांना ऑटो रिक्षा देण्यात आल्या. नाशिक जिल्हा अध्यक्ष ऍड. शशिकांत व्वहारे यांनी प्रास्ताविक केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूर येथे तेली समाज बांधवा तर्फे रॉली काढण्यात आली आणि या रॅली ला हजारोंच्या संख्येने तेली समाज बांधव सहभागी झाले