Sant Santaji Maharaj Jagnade
दि. 8 जानेवारी 2016 सिन्नर शहर तिळवण तेली समाज सिन्नर तर्फे श्री.संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्साहात साजरी करण़्यात आली. यावेळी मोठया प्रमाणत समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले.
दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी नंदुरबार शहरात संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त तेली समाजाने भव्य शोभा यात्रा काढण़्यात आली होती. यावेळी तेली समाजातील 9 ते10 हाजार समाज बाधवांनी शोभा यात्रेत भाग घेतला होता.
संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री संत जगनाडे महाराज तेली संस्था आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती दर्शविली.
नागपूर येथील जवाहर विद्यार्थी वसती गृह येथील संत शिरोमनी संताजी महाराज यांना महाराष्ट्र प्रांतीक युवक आघाडी च्या वतीने विनम्र अभिवादन करून भजन किर्तण करन्यात आले,
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 2) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
स्वातंत्र्य हे एका एकी येत नसते. स्वातंत्र्य जावून गुलामी एका रात्रीत येत नसते. त्यासाठी दिर्घ काळ समाज मन घडत आसते. स्वातंत्र्याचे मन घडत असण्यात संत नामदेव संत जोगापरमानंद जसे मुळ आहे. हे संत तुकारामांनी आपल्या स्वप्नातील द्रिष्टां द्वारे नमुद केले आहे. व कवित्व सत्याचे केले, कवित्व स्वातंत्र्याचे केले, कवित्व सामाजीक हक्काचे केले. कवित्व राजकीय जाणीवांचे केले. पुरंदरंनी शिवचरित्र नावाच्या बखर सारख्या पुस्तकात जो देखावा उभा केला आहे. तो किती खरा किती खोटा हे तुकारामांच्या अभंगावरून सामाजीक जाणीव समोर येते. बहामनी राजाचे पाच तुकडे झाले. ही राज्यक्रांती झाली या राज्य का्रंतीत अहमदशाह व निजामशहा हे मुळचे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते.