Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड पुणे - 14, नामफलक उद्घाटन व मकरसंक्राती निमित्त हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप तसेच तुळशी रोप वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे, सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. प्रतिष्ठाण तर्फे पहिल्याच वर्षी हळदी-कुंकवाला वाण द्या तुळशीच, रक्षण करा पर्यावरणाच ही सामाजिक वनीकरण विभागाची संकल्पना राबविण्यात आली.
श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड पुणे - 14, नामफलक उद्घाटन व मकरसंक्राती निमित्त हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप तसेच तुळशी रोप वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे, सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. प्रतिष्ठाण तर्फे पहिल्याच वर्षी हळदी-कुंकवाला वाण द्या तुळशीच, रक्षण करा पर्यावरणाच ही सामाजिक वनीकरण वभागाची संकल्पना राबविण्यात आली.

या शिक्षणातून एवढेच शिकले की सत्तेत जायचे तर पहिला आपल्या तेली, माळी, सुतार, कुंभार, नाभीक, परिट या आपल्या जाती पाहिजेत. त्याच बळावर अर्थीक बलवान असलेल्या मराठा समाजाची सोबत. ही सर्व जुळवा करून ते 2004 मध्ये ते वेल्हा ग्रामपंचायत सदस्य झाले. सर्वांना सोबत घेऊन पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवडले गेले. तेंव्हा त्यांनी जि.प. चे नियम व निधी यांचा अभ्यास केला. मला मिळालेल्या या संधीचा लाभ माझ्या गटात गेला पाहिजे. डोंगरी विकासाचा निधी वाड्या वस्त्यावर घेऊन जाण्यात त्यांनी आघाडी घेतली.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा शनि मंदिर, परळी वैजनाथ, बिड येथ्ो तेली समाज,तेली युवक संघटना, श्री शनैश्वर प्रतिष्ठाण परळी वैजनाथ यांच्या तर्फे आयोजीत करण़्यात आला होता.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 6) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
स्वातंत्र्यात आज ही आपण कोन आहोत याची ओळख जेंव्हा होते तेंव्हा गुलामगीरीचा रस्ता सुरू होतो. हे वास्तव आहे. समाजा अंतर्गत संघटनेच्या नावा खाली जेव्हां विघटन करणारे एक केंद्र निर्माण होते तेव्हा समाजात वाद निर्माण होतो. समाजअंतर्गत मतात भेद निर्माण होऊन ज्यांना पारतंत्र्य लादावयाचे आहे त्यंना आपण आमंत्रणच देत आसतो. अशी सब कुछु वृत्ती नव्हे तर विकृती जेंव्हा प्रतिकृती म्हणुन समोर येते तेंव्हा चार शब्द मांडावे लागतात. समाजाच्या अंतर्गत प्रश्नाला भिडणारे निर्माण करण्यापेक्षा समाज बाहेरील शक्तींना भीडणारे बनवा आणी ही नेहमी प्रमाणे मी पुहा एक गुन्हा या निमित्ताने करीत आहे.