Sant Santaji Maharaj Jagnade
येरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुरद्वारा आयोजित
सामुहिक विवाह सोहळा 2016
रविवार दिं17 एप्रिल 2016 रोजी , वेळ सकाळी 11.00 वा. विवाह स्थळ :- गणेश नगर, महावीर उद्यानचे पटांगण, नागपुर
अभिजित मो. देश्माने, तेली गल्ली, teliindia.com
संत संताजी महाराज व छञपती शिवराय हे तुकारामाचे श्रेष्ठ शिष्य होत. संत तुकारामाच्या एका मुलांचे नाव हे संताजी होते व त्यांचे आकाली निधन झाले होते. व तुकाराम महाराज हे संताजींना आपल्या मुला प्रमाणेच मानत होते. शिवरायांचे स्वराज्यांची पायाभरणीचे महान कार्यहे संत तुकाराम व संताजी महाराजांनी केले.
शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ संताजी महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्याची शक्यता आहे.
चाकण - प्रिय समाज मित्रांनो व माता पिता बंधु भगिनी 2012 ते 2016 या 4 वर्षाींच्या कारकिर्दीत 4 महोत्सव (पुण्यतिथी ) पार पडली संत शिरोमणी संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव 317 वर्षे पुर्ण झाली आपण सर्व जण जाणता आहात. जगद्गुरू तुकाराम महाराज संत शिरोमणी संताजी यांच्या अनमोल रत्नांच्या ज्ञानाचा या जगाला विशेष करून वारकरी संप्रदायाला संताजी महाराज लिखीत तुकाराम गाथेने फर मोठे मान प्राप्त झाले यापुढे ही होत राहील आशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
श्री. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगरुनगर तर्फे महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ तेली धर्मशाळा, तेली आळी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे आयोजीत करण्यात आलेला होता. या क्रर्यक्रमांस महिला वर्गाची उपस्थीती लक्षणिय होती. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 2) - मोहन देशमाने
तेली समाजाच्या आघाडीच्या मासीकात परवा एक लेख वाचला तेंव्हा मला जानेवारी 2014 मधील प्रसंग आठवला. तो प्रसंग घडला तेंव्हाच सांगीतले विचार दडपू नका कारण हे बुमर्यांग तुम्हाला ही दडपुन टाकेल. रहाता जि. नगर येथे श्री संत संताजी पुण्यतीथी होती. जिल्हा पातळी वरील नेते हजर होते. ही घटना घडण्यापुर्वीची समाज अवस्था पाहू विकासाचा महापुरूष म्हणून त्यावेळचे गुजराथचे मुख्यमंंत्री मा. नरेंद्र मोदी भावी पंतप्रधान म्हणून समोर होते. ते जन्माने तेली आहेत. आणी याच वेळी भाजपाने त्या त्या जातीतले नेते निवडून त्या जाती आपल्या पंखा खाली घेण्यास महा रस्ता निर्माण केला होता.