तिळवण तेली समाजातील समाजहिताच्या गरजा लक्षात घेऊन पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात आज दि. ५/७/२०१५ चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पुणे येथे श्री. रमेश भोज यांच्या अध्यक्षतेखाली श्री. विजय रत्नपारखी, सौ. राधिकाताई मखामले, श्री. दिलीप शिंदे, श्री. संतोष व्हावळ, श्री. प्रीतम केदारी, श्री. महेश अंबिके, श्री. गणेश चव्हाण, श्री. अनिल उबाळे, श्री. राजू हाडके, श्री. संदीप चिलेकर, श्री. सचिन काळे, श्री. सूर्यकांत बारमुख यांनी एकत्र येऊन विचरविनिमय करून नवीन संघटना स्थापना करण्याचे एकमताने ठरविले.
श्री. संताजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान श्री. क्षेत्र सुदुुंबरे येथुन दिनांक ८ जुलै २०१५ रोजी होत असुन महाराजांच्या पालखी रथासाठी या वर्षी श्री. ज्ञानोबा बाबूराव भगत रा. डोंजे, ता. हवेली, जि. पुणे यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीस या वर्षाचा मान मिळालेला आहे. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख श्री. अरूण काळे यांनी दिले.
मिती अधिक आषाढ वद्य ॥७॥ बुधवार दि. ०८/०७/२०१५ ते निज आषाढ वद्य. ॥१५॥शुक्रवार दि. ३१/०७/२०१५
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे शिष्यवृत्ती फॉर्म
श्री. दिलीप फलटणकर
सर्व धर्मातील, पंथातील, जातीतील अठरा पगड लोक वारीत सहभागी होतात. सामाजिक समतेच आणि एकात्मतेच दुसरं उदाहरण नाही. तिथं कोणी लहान नसतो, मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, तो असतो फक्त वारकरी. तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेला असतो. म्हणून पंढरपुरचा पांडुरंग हा खर्या अर्थानं प्रत्येकाला आपला वाटतो. सात, आठलाख लोक एकत्र येऊन श्रद्धेनं, भक्तीनं, एखाद्या देवासाठी जात आहेत. अशी ही जगाच्या पाठीवर एकमेव घटना असावी.