Sant Santaji Maharaj Jagnade
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची इगतपुरी तालुकास्तरीय पुण्यतिथी सोहळा मंगळवार, दि. २४/१२/२०१९ रोजी साजरा करण्या येणार आहे. सर्व तेली समाज बांधवांनी कार्यक्रमास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे विनंती आयोजका कडुन करण्यात आलेली आहे.
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 2019 सामेवार दिनांक 23/12/2019 व मंगळवार दिनांक 24/12/2019 रोजी संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाची कार्यकम रूपरेषा सोमवार दिनांक 23/12/2019 रोजी सकाळी 5 वाजता ग्रामस्वच्छता, दुपारी 12 वा. कलश स्थापना, सायं. 8 वा. श्री. संत गजानन महाराज भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संताजी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा रजि. नं. ९७४४/०३/भं. या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्याला समाजातील वरिष्ठ पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे.
औरंगाबाद,(प्रतिनिधी) - अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबिनेट मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या व कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी यांनी गणेश पवार यांची निवड केली.गणेश पवार यांनी औरंगाबाद शहरात विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वी करून समाज संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
कहाड : कोल्हापूर लिंगायत तेली समाज अंतर्गत राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी हा मेळावा पार पडणार आहे, अशी माहिती समाजाचे कन्हाड शहराध्यक्ष रवींद्र मुंढेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत तेली समाज आहे.