ब्यावर साहू समाज समिति की बैठक का आयोजन बुधवार को बिजयनगर रोड स्थित साहू वाटिका में आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता रघुनाथ पंचोली ने की। बैठक में आगामी आठ अप्रैल को आयोजित होने वाले सामूहिक विवाह सम्मेलन पर चर्चा की गई। मीटिंग में अजमेर जिले में समाज के नवनिर्वाचित पार्षदों का माला व साफा पहनाकर सम्मानित किया ।
दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आहे प्रती वर्षी प्रमाणे या ही वर्षी भव्य दिव्य अशी वहान रॅली श्री संस्थान गणपती येथुन सकाळी ९ वा. काढण्यात येणार आहे. तसेच संताजी महाराज यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व तेली समाज बांधवानी सहकुंटुब सहपरिवार जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक - तेली समाज संभाजीनगर
श्री संताजी महाराज जयंती उत्सवाचा पावन पर्वावर संताजी बिग्रेड तेली समाज महासभा महा. राज्य नागपूर यांच्या सहकार्याने आयोजीत भव्य बाईक रॅली व महाप्रसाद रविवार दि.८ डिसेंबर, २०१९ ला सकाळी ९.३० वाजता स्थळ : पारडी हनुमान मंदीर भंडारा रोड, नागपुर. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा श्री संत संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी भव्य बाईक रैलीचे आयोजन पारडी हनमान मंदिर ते ते नंदनवन जगनाडे चौक पर्यंत केले आहे
संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती दि.८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्यात यावी असे आशयाचे परीपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्या अनुषगाने बृहन्महाराष्ट्र तेली समाज संस्थाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व सर्व विद्यापीठात संताजी महाराज यांची प्रतिमाचे वाटप करण्यात आले.
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संत संताजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यावेळी उपस्थित अध्यक्ष सुभाष हाडके, उपाध्यक्ष मनोज विभुते, सचिव प्रमोद दळवी व मा. अनिल भोज, मा.अनिल क्षीरसागर, मा. संजय भोज, अशोक भोज, दिलीप भोज, रघुनाथ दळवी, विठ्ठल क्षीरसागर, संतोष किर्वे, संतोष क्षीरसागर हे सभासद व समाज बांधव उपस्थित होते.