पुणे: तेली सेना महाराष्ट्राच्या वतीने पुण्यातील चंदननगर येथे रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता मातोश्री अनुसया सांस्कृतिक भवन, साईबाबा मंदिराजवळ भव्य वधू-वर परिचय मेळावा आणि लग्नगाठ विशेषांक 2025 आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा विवाह इच्छुक तरुण-तरुणींसाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार असून, तेली समाजातील लग्न जुळवण्यासाठी समर्पित प्रयत्नांचा भाग आहे.
अमरावती: मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, समाज गौरव पुरस्कार, दसरा मिलन आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम ५ ऑक्टोबर २०२५ रोजी हर्ष मंगलम, शंकर नगर, हरिगंगा ऑईल मिल जवळ, अमरावती येथे अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला. हा सोहळा समाजाच्या एकजुटीचे आणि प्रगतीचे प्रतीक ठरला,
सांगली: तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली आणि सांगली शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा येत्या रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सांगली-इस्लामपूर रोडवरील टोल नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालय, सांगलीवाडी येथे होणार आहे.
नाशिक: नाशिक शहर तेली समाज मंडळाने आयोजित केलेला वधू-वर आणि पालक परिचय मेळावा २०२५ हा समाजातील वधू - वर पालकाना एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम आहे. हा मेळावा २५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असून, यात समाजातील वधू-वरानां योग्य जोडीदार शोधण्याची संधी मिळेल. या मेळाव्यात वधू आणि वरांचा परिचय होईल,
पिंपरी-चिंचवड, पुणे: खान्देश तिळवण तेली समाज मंडळाने पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात आयोजित केलेला तिसरा राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा २०२५ हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम आहे. हा मेळावा समाजातील वधू - वर पालकाना एकत्र आणण्यासाठी आणि एक व्यासपीठ प्रदान करेल. या मेळाव्यात भाग घेणाऱ्या वधू आणि वरांना स्टेजवर परिचय देण्याची संधी मिळेल,