Sant Santaji Maharaj Jagnade
लातेहार (झारखंड) : तेली साहू समाज संघर्ष समिति (टीएसफोर) लातेहार की ओर से बिहार के समस्तीपुर जिले की मोरवा विधानसभा से लगातार दूसरी बार निर्वाचित राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) के विधायक रणविजय साहू के सम्मान में आयोजित होने वाले भव्य अभिनंदन समारोह की तैयारियों को लेकर एक महत्वपूर्ण बैठक लातेहार शहर के राज होटल में संपन्न हुई।
धारूर (जि. बीड) : धारूर शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी श्रद्धांजली व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम शहरातील लिंगायत मठात आयोजित करण्यात आला होता. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या काळातील थोर संत असून अभंग गाथेचे प्रमुख लेखक म्हणून ते ओळखले जातात.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
नांदगाव (ता. येवला, जि. नाशिक) : श्री संत सावता महाराज मंदिरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. हा सोहळा प्रांतिक तैलिक महासभेचे युवा प्रदेश महासचिव तथा भारतीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सोनई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर ) : तिळवण तेली समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. संताजी महाराज हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रमुख लेखक आणि संत परंपरेतील थोर व्यक्तिमत्व मानले जातात. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित हा उत्सव सोनई येथील भजनी मंडळ मंदिरात दि. १० ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडला.
अमरावती : संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती पर्वानिमित्त एक विशेष आणि प्रेरणादायक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दि. ८ डिसेंबर रोजी संताजी भवन, उषा कॉलनी, एम.आय.डी.सी. रोड, अमरावती येथे 'श्री संताजी जगनाडे महाराज : संतत्व व कवित्व' या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हे पुस्तक संताजी महाराजांच्या संतत्वाच्या आणि कवित्वाच्या पैलूंचा सखोल अभ्यास करणारे आहे.