Sant Santaji Maharaj Jagnade आसगाव : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. असून त्याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यानिमित्ताने संताजी समितीकडून महाराष्ट्र वारकरी विद्यापीठच्या माध्यमातून संतांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा: सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त एक मोठा आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी सातारा शहरातील महासैनिक लॉन, करंजेनाका येथे राज्यस्तरीय मोफत वधु-वर आणि पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा तिळवण तेली समाजातील युवक-युवतींना एकमेकांशी परिचय साधण्याची, लग्नाच्या बाबतीत योग्य जोडीदार शोधण्याची
महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये मौजे गोगवे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे पवार वस्तीवर (पाडा) कातकरी समाजाच्या लोकांना कौटुंबिक साहित्याचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले.
दिनांक 4- 11 -2025 रोजी श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्रच्या वतीने आर्थिक व सामाजिक विकासापासून दूर असलेल्या कातकरी समाजाला कौटुंबिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने प्रथमच मोफत राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२५ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत होईल.
पुणे: तेली सेना महाराष्ट्राच्या वतीने पुण्यातील चंदननगर येथे रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता मातोश्री अनुसया सांस्कृतिक भवन, साईबाबा मंदिराजवळ भव्य वधू-वर परिचय मेळावा आणि लग्नगाठ विशेषांक 2025 आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा विवाह इच्छुक तरुण-तरुणींसाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार असून, तेली समाजातील लग्न जुळवण्यासाठी समर्पित प्रयत्नांचा भाग आहे.