देवळी : श्रीराम नवमीच्या दिवशी भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांची पत्नी, माजी नगराध्यक्ष शोभा तडस हे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, तिथे विश्वस्त मुकुंद चौरीकर यांनी त्यांना पूजा करण्यापासून रोखले, ज्यामुळे परिसरात मोठा रोष निर्माण झाला आणि निषेधाचे स्वर उमटले. अखेर आज,
शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करून त्याची जनसंपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून त्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता संताजी चौक, चौधरी गल्ली, शिरपूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग-परळ विभागात गुढी पाडव्याच्या स्वागतार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडले. या शोभायात्रेस समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
मुंबई: गुढी पाडवा 2025 च्या निमित्ताने गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या सहकार्याने भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचे तेली समाजाच्या वतीने विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.