Sant Santaji Maharaj Jagnade समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून शिकवणी देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ व्या जयंती दिनानिमित्त विदर्भात ८ डिसेंबरला ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. देऊळगाव राजा न. प. वाचनालयात सर्वप्रथम श्री संत संताजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे यांनी जगनाडे महाराजांच्या जिवन चारीत्रावर प्रकाश टाकला.
देऊळगावराजा - तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी तर म्हटले आहे, संताजी तेली बह प्रेमळ अभंग लिहीत बसे जवळ धन्य त्याचे सबळ संग सर्वकाळ तुक्याचा आणि भक्ती लीलामृत या ग्रंथात, संताजी तेली वैष्णववीर तसेच तुकारामांची गाथा संताजीच्या अथक परिश्रमांमुळेच जिवंत राहू शकली, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती निमित्त छोटे खानी कार्यक्रमत केले.
धुळे : कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी सामाजिक दायित्व स्वीकारून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवक महासंघातर्फे संत जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
तेली समाजाचे आराध्य दैवत व तुकाराम महाराजांचे मूळ कथेचे लेखनकर्ते संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ वी जयंती संताजी महाराज जगनाडे सभागृह जुनी वस्ती मुर्तिजापुर येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून हारअर्पण करण्यात आले यावेळी संताजी सेनेचे तालुकाध्यक्ष सुमीत सोनोने यांनी संताजी महाराजा बद्दल विचार व्यक्त केले
अकोला - संताजी नगर स्थित संत संताजी महाराज मंदिरात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश डवले अध्यक्ष राज्य तेली समाज समन्वय समिती हे होते. राज्य सरचिटणीस प्रशांत शेवतकर, शेखर देठे राज्य समन्वयक, गोपाल थोटांगे, वैशाली निवाणे, श्वेता तायडे, शितल गोतमारे, दिनेश साठवणे, मेघा साठवणे उपस्थित होते.