दि.१ जानेवारी २०२१ ते २० डिसेंबर २०२२ हे वर्ष श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्ष म्हणून तिर्थ क्षेत्र, संतुबरे येथे साजरे होत आहे. या निमित्ताने संताजी महाराजाच्या पादुका व गाथा यांची भव्य रथयात्रा महाराष्ट्रभर काढण्याचे नियोजित आहे. या निमित्ताने सर्व समाज बांधवांना महाराजांचे पादुका व गाथा यांचे दर्शन घेता येईल. याची सुरुवात दि. ८/१२/२०२१ रोजी महारांची जयंती दिनांका पासून श्री क्षेत्र संदुबरे येथून सुरुवात होत आहे.
जय संताजी प्रतिष्ठाण, बीड जिल्हा आयोजित तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साहू महासभा, नवी दिल्ली तथा समाजभूषण आदरणीय ना.जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आज बीड येथे स्व. सोनाजीराव (नाना) क्षीरसागर या ठिकाणी संपन्न झाला.
अहमदनगर - युवा पिढीने समाजसेवेचे व देशसेवेचे कार्य करून भारत देशाला बळकटी देण्याचे कार्य करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीचे कार्य युवाशक्तीने हाती घ्यावे. देशाच्या विकासात युवाशक्तीचे मोलाचे योगदान आहे.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून आजपर्यंत त्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले असल्याचे मत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी व्यक्त केले. ते खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
नगर - महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक-अहमदनगर विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.