धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून आजपर्यंत त्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले असल्याचे मत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी व्यक्त केले. ते खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
नगर - महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक-अहमदनगर विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमीत्त भव्य सर्व रोग निदान शिबीर सवलतीच्या दरात रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे दि. ०८ डिसेंबर २०२१, बुधवार, वेळ : सकाळी १०.०० ते दु. २.०० पर्यंत सकाळी ८ वा. ( मास्क अनिवार्य आहे ) आयोजित करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, सातारा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र तसेच समस्त सातारा जिल्हा तेली समाज यांचे संयुक्त विद्यमाने आजोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रा स्वागत मेळावा.
तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर वतिने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहर स्तरीय चित्रकला स्पर्धा बुधवार दि. ८ डिसेंबर २०२१, सकाळी ठिक ०९.०० ते ११.०० बक्षिसवितरण - स्पर्धा संपलल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.