Sant Santaji Maharaj Jagnade संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित बसे जवळ ॥ धन्य त्यांचे भाग्य संबळ।संग सर्व काळ तुकयाचे ॥
महाराष्ट्र ही जशी शुरांची भूमी आहे तशी ही संतांचीही पुण्यभूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व ज्यांच्या अभंगवाणीने सर्व महाराष्ट्राला भक्तीरसात बुडवून टाकले अशा संत तुकाराम महाराज व त्यांचेच समकालीन सेना न्हावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत रोहिदास इ. संत होवून गेले.
शिर्डी : अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिडी शहर तेली समाजाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात येणार असून, याचा शुभारंभ साईनगरीच्या प्रांत कार्यालयापासून करण्यात आला.
शिरपूर - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी यांच्या वतीने संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ डिसेंबर पर्यंत निबंध पाठवावेत ही निबंध स्पर्धा संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज आणि आजचा तेली समाज या विषयावर आयोजित करण्यात आलेली आहे.
आरमोरी : श्री संताजी जगनाडे महाराज यांची २८३ वी जयंती सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात साजरी करण्यात यावी, असे शासनाने परिपत्रक काढले आहे. संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे.
अहमदनगर महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि. ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे,