जय संताजी ,
कै.दादातेली-हरितेली यांच्याप्रमाणेच त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन , ' व्यक्ती पेक्षा समाज श्रेष्ठ ' हे मतप्रमाण मानत सामाजिक एकोपा जोपासला जावा ह्याकरिता श्री क्षेत्र पैठण येथे संताजी युवक तेली महासंघाच्या माध्यमातून श्री. सोमनाथ बद्रीनाथ सर्जे यांच्या पुढाकाराने मागील पंधरा वर्षांपासून समाजातल्या प्रत्येक घटकांचे विकासाभिमुख ध्येय व धोरणात्मक सामाजिक हित जोपासण्याचे काम आम्ही आज वर करत आलो आहोत
देवगड : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने देवगडमधील विविध शासकीय कार्यालयात संत जनगाडे महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देवून जनगाडे महाराजांची जयंती शासनाच्या आदेशानुसार ८ डिसेंबर रोजी कार्यालयात साजरी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तेली समाजोन्नती संघ, ता. चिपळुण व गुहागर, कार्यालय - वरळी, मुंबई-१८, आयोजित तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर तेली समाजातील मान्यवर उद्योजक आणि व्यवसायिक यांचा परिचय व्हावा व आपल्या सर्वांना त्यांच्या व्यवसायाची, उत्पादनाची माहिती मिळावी तसेच विद्यार्थी व तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळावे व त्यातुनच उद्योजक घडावे, त्याचप्रमाणे समाजातील बंधु-भगिनी यांनाही याचा उपयोग व्हावा याकरिता आपल्या संघातर्फे सदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
पुणे : संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे.
रविवार, दि.४ डिसेंबर 2019 समय: 11 से 2 स्थान : समाधिस्थल, सुदुंबरे, ता.मावल, जि.पुणे कार्यक्रम की अध्यक्षता : श्री. शिवदासजी सेठ उबाळे अध्यक्ष, श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदंबरे मुख्य अतिथी श्री. प्रमोदजी साह, सांसद, नेपाल श्री. भरतजी साह, विधायक, नेपाल श्री. सत्यनारायणजी साह, समाजसेवक, नेपाल सत्कारमुर्ती :श्री. कृष्णाजी खोपडे, विधायक, पूर्व नागपुर श्री. टेकचंदजी सावरकर, विधायक, कामठी, नागपुर श्री. राजूभाऊ कारेमोरे, विधायक, तुमसर श्री. संदिपजी क्षिरसागर, विधायक, बिड श्री. राजूभाई झापडे, अध्यक्ष, तेली समाज, खामगांव (बुलढाणा)