धुळे शासकीय आदेशानुसार तेली समाजाचे आराध्य दैवत थोर संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर खानदेश तेली समाज मंडळातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना भेट दिली. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत श्री. संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असणे आवश्यक आहे.
अमरावती तेली समाज श्री संताजी समाज विकास संस्था वधु वर फॉर्म, सदर वधु वर फॉर्म तेली समाजातील वधुवर पालकानी भरून संपर्क कार्यालय डॉ. विजय अजमिरे , मंगल कार्यालय रोड, पवार ड्रायव्हींग जवळ, जोगळेकर प्लॉट, अमरावती येथे पाठवाव अशाी विनंती संस्थे तर्फे करण्यात आलेली आहे.
जळगाव संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित तेली समाज वधुवर मेळाव्यात १९०५ युवक-युवतींनी परिच्य करून दिला.दरम्यान,मेळाव्यात पाच विवाह जुळले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधुवर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. पुष्पमती गुळवे हायस्कूल व्या प्रांगणात आयोजित मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणाव चे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी हे होते.
दि १७-११-२०१९ रोजी. बृहन्महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने महाराष्ट्र महिला अध्यक्षा राजश्री भगत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा आणी शहर महिलांची मीटिंग आयोजित केल्या गेली . जिल्हा महिला अध्यक्षा सौ मंगल जाधव, उपाध्यक्षा मंगल धोमकर, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा पुरूष अध्यक्ष डॉ. चौधरी साहेब पुणे अध्यक्ष श्री रवींद्र शिंदे, महाराष्ट्र संघटक श्री मुर्कुडे, पुणे शहर सचिव श्री गणेश पिंगळे उपस्थित होते.
जय संताजी तेली सामाजिक बहुउद्देशिय संस्था, अमरावती वधु वर फॉर्म, राठोड तेली समाजातील उपवर वधु वरांचे स्थळांची माहिती होण्याचे दृष्टीने वधु वर परिचय पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्या करीता राठोड तेली समाजातील पाल्यांनी आपल्या उपवर वधु किंवा वरांचे नाव पुस्तकांमध्ये नोंदविण्या करीता खाली दिलेल्या नोंदणी फार्म मध्ये नमुद केल्याप्रमाणे फॉर्म खालील पत्त्यावर पाठवण्याची विनंती करण्यात आलेली आहे.