सांगली : तेली समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा तेली समाज महासंघातर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय तेली समाजाचे युव सदस्य विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. समाजाच्या स्मशानभूमीपासून समाजमंदिरापर्यंत विविध प्रश्नांबाबत शासनपातळीवर सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.
पाल्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी आ.अमरीशभाई पटेल, शिरपुरात तैलिक समाजातर्फे गुणगौरव
शिरपूर मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यात अपयश आल्यास येत्या पिढ्यांचे नुकसान होईल हे लक्षात घ्यावे. सर्व सोयीसुविधायुक्त शिक्षण घेवूनच येणारी पिढी स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. या पिढीतूनच देशाचे व समाजाचे कल्याण होवू शकेल. आपल्या गरजा कमी करा, अनावश्यक खर्च, हौसमौजेला मुरड घाला पण पाल्याना सर्वसोयीयुक्त शिक्षण द्या असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व तेली समाज कर्तबगार महिला पुरस्कार वितरण सोहळा - दि. 6/10/2019 (रविवार) रोजी
औरंगाबाद,प्रतिनिधी,प्रतीवर्षी प्रमाणे याहीवर्षी कॅबिनेट मंत्री आदरणीय,जयदत्त (आण्णा) क्षीरसागर,विधानसभा अध्यक्ष श्री.हरीभाऊ बागडे (नाना) उघोगमंत्री श्री.अतुल सावे,वैधानीक मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षः श्री.भागवत कराड,शिवसेना नेते श्री.चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री.अंबादास दानवे,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा, श्री.अनिलभैय्या मकरिये, भारतीय जनता पार्टी,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव तथा नगर सेवक जालना,श्री.अशोक (आण्णा) पांगरकर,जिल्हा परिषद सदस्य श्री.सुरेश सोनवणे सर, तसेच औरंगाबाद तेली समाज