दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व संताजी सेना पातूर तहसील कार्यालय येथे तसेच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री.गुल्हाने साहेब यांना संताजी सेना अकोला यांच्या वतीने प्रतिमा तसेच शासकीय जी. आर.देऊन जयंती साजरी करण्यानिमीत्त निवेदन दिले. या प्रसंगी संताजी सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोजदादा जुमळे,विधी आघाडी अध्यक्ष देवाशिष काकड,
दि.०२/१२/१९ दिनांक रोजी साक्री तिळवण तेली समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊन साक्री शहरातले शासकीय कार्यालय येथे संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली साक्री शहरातील तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन , नगर पंचायत , पंचायत समिती, व साक्री बस डेपो व इतर सर्व कार्यालय येथे प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
दि. ०८. डिसेंबर संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्ताने व 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस या औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तसेच अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "संतांची थोरवी" निबंध स्पर्धा व "विश्वकल्याण" क्रांतिकारक व राष्ट्रभक्ती या विषयावर वक्तृत्व / भाषण स्पर्धा आयोजित केली आहे.
अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने दि.2/12/2019 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच शैक्षणिक संस्थामध्ये संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथून सुरवात करण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मुंबई विभाग यांच्या वतीने आपल्या समाजभगिनी व मुंबई महानगर पालिकेच्या सन्माननीय महापौर सौ. किशोरीताई किशोर पेडणेकर यांचा सत्कार मुंबई महानगर पालिका मुख्यालय येथे करण्यात आला तसेच शासकीय आदेशानुसार रविवार दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत निवेदन देण्यात आले.