१) भारतीय इतिहास सुरूचहोतो तेल्यापासून- प्राचीन भारतीय पहिला सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा तेली होता. २) तेली म्हणजे तेल काढून विकणारे,हा एक संकुचित अर्थ आहे. उलट तेली लोकांनी बियांपासून जो रस काढून उपयोगात आणला, त्याला तेल हे नाव मिळाले. ३)तेली हा शब्द त्रिलिंगीशब्दापासून तैलिंगी - तैलिक -तैली -तेली असा उत्क्रांत झाला आहे.ज्याचा अर्थ - तीन चिन्हे किंवा वर्णातील असा होतो. म्हणजे तेली क्षत्रिय, ब्राह्मण व वैश्य या तीन ही वर्णात होते. ४) शाक्यमुनी म्हटले गेलेले तथागत गौतम बुद्ध सुद्धा तेली होते, त्यामुळे तेली सम्राटांनी बौद्ध धर्माचा स्वीकार, प्रचार व प्रसार केला.
नाशिक शहर तेली समाज वधु-वर पालक मेळावा 25 डिसेंबर 2018
मेळाव्याचे ठिकाण : कै. यादवराव वाघ नगर, (कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृह ), भामा नगर, मुंबई नाका, नाशिक - 11
फॉर्म पाठविण्याचा पत्ता :- श्री. संताजी मंगल कार्यालय, अशोकस्तंभ, नाशिक 422001, फोन नं. (0253) 2576425
दिनांक ०९-१०-१८ रोजी मंगळवार ला वधु-वर सुचक च्या बाबती मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन समाजबांधव च्या प्राप्त झालेल्या मौखिक तक्रारीनुसार वधु- वर च्या पालकांची आर्थिक व मानसिक फसवणूक व छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे लेखी निवेद्वन मा पोलिस आयुक्त श्री भुषणजी उपाध्याय साहेब यांना नागपूर येथील श्री संताजी नवयुवक मंडळा तर्फे दखल घेऊन निवेदन देण्यात आले.....!
पुणे संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजिते राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०१८
मेळाव्याचे ठिकाण कै. रंगनाथ सिताराम मेहेर नगर बैकुंठवासी है.भ.प.माधवराव बबनराव अंबिके सभागृह राजमाता जिजाऊ सभागृह ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे-४११०१९ रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वीजे पर्यंत
संपर्क कार्यालये वे फॉर्म स्विकारण्याची पत्ती : संतााजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड द्वारा ऑर्चिड प्रिंटर्स, शॉप नं.०४, ओसिया आर्केड, पुर्णानगर, चिंचवड, पुणे-१९
चंद्रपूर : तेली समाजाचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे याचे वृद्धापकाळानं निधन. ते 86 वर्षांचे होते. मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरच्या अरनेजा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. पी व्ही नर्सिम्हा राव यांच्या मंत्रिमंडळात ते तत्कालीन अर्थमंत्रीे मनमोहन सिंग यांचे सहकारी होते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून ते सलग चारदा निवडून आले.