Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ तेली समाज वधू-वर परिचय पुस्तिका विमोचन
सर्वशाखीय तेली समाजातील उपवर वधू वर परिचय पुस्तिका प्रकाशन व तेली समाज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा.
याप्रसंगी तेली समाजाचे नेतृत्व आणि वर्धा येथील खासदार श्री रामदास तडस यांच्या शुभहस्ते तेली समाज यवतमाळ वधू वर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा द्वारा आयोजित तेली समाज उप वधु - वर व पालक परिचय मेळ्यावाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.रामदासजी तडस साहेब, प्रमुख अतिथी - माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे , उद्घाटक - श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब कोषाध्यक्ष अ.भा.तैलीक महासभा, सुखदेव वंजारी उपस्थित होते.
नाशिक - श्री संत संताजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने सिन्नर तालुका तैलिक महासभा व सिन्नर शहर तेली समाजाच्या वतीने 2016 दिनदर्शिका व तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा समावेश असलेली दूरध्वनी सूची चा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
अहमदनगर जिल्हातील, कोपरगाव तालुक्यातील वारी येथे श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या भुवनाचे भूमिपूजन मा.ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे ( महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री) यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी मा. बिपीनदादा कोल्हे साहेब, (संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष ) सर्व जिल्हा व तालुक्यात पदाधिकारी, समस्त तिळवण तेली समाज बांधव वारी उपस्थित होते.
नागपूर - तेली समाजाचे जवाहर विद्यार्थी गृह नागपूर येथे तेली समाजाचा मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस उपस्थित होते. त्याचबरोबर तेली समाजातील नेते व महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री बावनकुळे देखील उपस्थित होते.