Sant Santaji Maharaj Jagnade
वर्धा - परावा झालेल्या वर्धा येथील विधान सभेच्या चुरसीच्या निवडणूकीत मा. आ. रामदासजी भगवानदसजी अंबटकर हे विजयी झालेत. विदर्भात भाजपाने 4 थे आमदार तेली समाज बांधव केलेत. या साठी खा. रामदासजी तडस यांनी परिश्रम घेतले. त्या बद्दल दोघांचे आभार.
एरंडेल तेली समाज ब्रम्हपुरी - आजच्या एकविसाव्या शतकातील आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपला तेली समाज सर्व स्तरांमध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाचा अभाव शेतीत येणाऱ्या उत्पादन व सर्वस्तरीय वाढदिवस गरिबी इत्यादी समस्या समाजाच्या प्रगतीत मारक ठरत आहे. मुळ समस्यांच्या निवारणार्थ समाज ब्रम्हपुरी द्वारे रोजगार मार्गदर्शन शिबीरााचे आयोजन दिनांक 10/06/2018 रोजी करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, कारंजा जि. वर्धा ( तेली समाज ) चे वतीने "गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा" कार्यक्रम दि. 28/7/2018 ला स्थानिक अलिष्का सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. मोरेश्वरराव भांगे तर प्रमुख पाहुणे मा. खासदार श्री. रामदासजी तडस, जिल्हाध्यक्ष श्री. अतुलभाऊ वांदिले, सौ. सोनालीताई कलोडे, जि.प. सभापती श्री. प्रशांतभाऊ सव्वालाखे,
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपचा वापर ‘टाईमपास' म्हणून होणार नाही, यासाठी कठोर नियमही तयार केले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा दोंडाईचा. "खान्देश तेली समाचार गृप" च्या वर्धापन प्रथम वर्धापनदिनानिमित्त. दि.21/10/2018.रविवार रोजी दोंडाइचा येथे गृपच्या वतीने "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार" प्रदान करण्यात आला. त्यामध्ये सन्मान ट्राॅफी ,शाल,श्रीफळ,पुष्पहार ,प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.ह्या कार्यक्रमात सत्कार स्विकारतांना लोहारा ता.पाचोरा जि.जळगांव. येथील गृपचे पत्रकार मा.सो.श्री. दिपक वामन चौधरी.सोबत मुख्य संपादक - मा.सो.श्री.प्रकाश काशिनाथ चौधरी.दोंडाईचा.(काळा कोट घातलेले) याप्रसंगी, भोपाल M.P तेली पंच मंडळाचे सचिव,