शेवटच्या टोकाचे हे बोलणे एैकल्यावर बसलेल्या सर्व मंडळींना माझा राग आला. बाजुचे आचारी व कामगार यांनी राऊतांना मारण्यासाठी कोणी उलथणे, कुणी फाट्या, कुणी काठ्या घेतल्या व ही सर्व खवळलेली माणसे राऊतांच्या अंगावर धावून आली. राऊत एक पाऊलही मागे न सरता म्हणाले, ’’महाराज, तुम्ही चोपदाराकरवी निरोप पाठवून मला बोलाविलेत आपणास माझे मत तळमळीने नम्रपणे सांगितले आपण योग्य न्याय न देता सहकार्यांकरवी अतिरेक करीत आहात, हे आपणासारख्या उच्च पदावरील माणासाला शोभत नाही.
समाजासाठी आपण काहितरी केले पाहिजे हि भावना मनात ठेवुन श्री. मोहन देशमाने हे गावकुस ते तंली गल्ली या मासिकातुन गेली कित्येक वर्षापसु समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. याचा अनुभव सर्व समाज बांधवांना आहेच समाज जिवनाचा अभ्यास, ओबीसी साठी चाललेली धडपड समाज संघटना समाज प्रबोधन समाजाच्या प्रगतीचा ध्यास हे सर्व तेली गल्ली मासिकाद्वारे आजपर्यंत करीत आलेले आहेत.
तेली समाज वधु -वर मेळावा वधु -वर फाॅर्म
mumbai teli samaj vadhu var melava from 2015
मुंबई :- बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई या उपरोक्त संस्थेच्या वतीने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २२ फेब्रु २०१५ रोजी दुपारी १.०० वा. म्युनिसिपल स्कुल सभागृह ना. म. जोशी. मार्ग, डिलाईल रोड, मुंबई - ४०००११ येथे आयोजित करण्यात आला.
मधुकर नेराळे :- मधुकर नेराळे हे तेली समाजातील श्रेष़्ठ कलांवंत. लोककला कराना त्यांचे हक्क व आधिकार मिळवुन देणाारे श्रेष्ठ व्यक्तीमत्व. ज्या काळात तमासगीर कलावंत, प्रतिष्ठित समाजात त्याज्य मानले जात, त्या काळी श्री. मधुुकर नेराळेंनी त्यांना संघटित करून आदराचे स्थान मिळवून दिले. तमाशा ही बहुजनांची कला अभंग राहुन लोकप्रिय वहावी म्हणून, ललबागला हनुमान थिएटर हा खुला रंगमंच उभारन तमाशा आणि तत्सम लोककलांना उपलब्ध करून दिला, एकेकाळी असं म्हटलं जायंच की, ढोलकी ऐकावी ती हनुमान थिएटरात, घुंगरूंच्या नाजकतीस तमाशा हनुमान थिएटर आणि मधुकर नेराळे ही नावे, मुंबईच्या कलाक्षेत्रात अनेक वर्षे पक्की निगडित आहेत.