Sant Santaji Maharaj Jagnade
शिरपूर - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी यांच्या वतीने संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ डिसेंबर पर्यंत निबंध पाठवावेत ही निबंध स्पर्धा संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज आणि आजचा तेली समाज या विषयावर आयोजित करण्यात आलेली आहे.
अहमदनगर महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि. ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे,
शिर्डी : राज्य शासनाने येत्या ८ डिसेंबर रोजी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचे आदेश शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर तेली समाजाच्या वतीने
नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.
जामखेड : यावेळी जामखेड तालुका प्रातिक तेली महासभा संताजी युवा प्रतिष्ठान जामखेड तालुका प्रातिक तेली महिला महासभा समाजा तर्फे श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंंती जामखेड येथे विठ्ठल अण्णा राऊत यांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली. तसेच जामखेड तहसिल कार्यलय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सरकारी ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यलय, जामखेड नगरपरिषद या सर्व ठिकाणी उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.