अहमदनगर :- जिल्हा तेली समाज महासभा आयोजित व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट अहमदनगर यांचे सौजन्याने श्री. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह कै. नारायणराव देवकर सभागृह अहमदनगर येथे रविवार दि. १० मे २००९ रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचयवसामुदायिक विवाह संस्कार सोहळा हजारो स्नेहीजनांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा अनेक दृष्टीने अर्थपूर्ण ठरला. वधू-वर परिचय वधू-वर सामुदायिक विवाह.
पुणे :- कै. दादा भगत समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी पुणे महानगर पालिकेत प्रयत्न करून तेली धर्मशाळे जवळच्या पुलाला श्री. संत संताजी जगनाडे पुल असे नामकरण महानगर पालिकेच्या ठरावा द्वारे केले. सदर पुलावर तसार बोर्ड ही लावला गेला परंतु मध्यंतरी पुलावरचा बोर्ड बरेच वर्ष गायब होता.
सप्टेंबर, तेली गल्ली 2009
भोसरी :- भोसरी तेली समजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मयुरी पॅलेस मंगल कार्यालयात दिनांक २/८/२००९ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. दिलीप फलटणकर - पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळावरील सल्लागार व राष्ट्रपती पदक विजेते हे होते. लसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू जाधव - शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका
पिंपळगाव, ता वैजापूर (अॅडव्होकेट गणपतराव सावणे, गंगापूर ह्यांनी लिहिलेल्या मुळ चरित्रावरुन संक्षिप्त केलेले चरित्र)
प. पूज्य गोटीराम बाबा यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मौजे गाढे पिंपळगाव या खेडेगावीतेली समाजात झाला.
कुंभारात गोरोबा व एकोबा, माळ्यांत सावता, सोनारात नरहरी वगैरे इतर जातीमध्ये असे अनेक भगवद्भक्त होऊन गेले. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात नामदेवाचे समकालीन असे तेली ज्ञातीत "जोगा परमानंद'' हे भगवद्भक्त होऊन गेले. हा महापुरुष बहुतेक सर्व संतमालिकेत उल्लेखिलेला आहे. कारण हे तेराव्या शतकांत मोठे साधू व बऱ्याच वरच्या दर्जाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते.