सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.
गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली.
इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा
पैठण दि 24 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज पुण्यतिथी ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण तालुक्याचे आमदार संदीपान पा भुमरे याचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद चे सभापती श्री विलास बापु भुमरे व सदस्य कापसे पाटील व नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक भुषण कावसानकर, ईश्वर दगडे, नगर आबासेठ बरकसे,संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे, सचिव भगवान मिटकर
औरंगाबाद,(प्रतिनिधी) - अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबिनेट मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या व कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी यांनी गणेश पवार यांची निवड केली.गणेश पवार यांनी औरंगाबाद शहरात विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वी करून समाज संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.