गेवराई तेली समाज :- संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या एकूण १४ टाळकांपैकी एक महत्त्वाचे टाळकरी होते. त्यांनी निरपेक्ष वृत्तीने व निस्सीम भक्तीने संत तुकाराम महाराज यांचे अभंग लिहून ठेवण्याचे व जतन करण्याचे महान कार्य केले.संघर्षाच्या काळात संताजी जगनाडे यांनी जगद्गुरु तुकोबाराय यांना साथ दिली.एव्हडे त्या दोघांत सख्य होते,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक विजय गवळी यांनी गेवराई येथे केले.
शिर्डी : संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्ताने व दि. १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवसाचे औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तसेच शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांच्या हस्ते करण्यात आले.
पैठण दि 8 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण नगरीचे नगर अध्यक्ष सुरज लोळगे, पैठण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री वारे साहेब, गीराशे साहेब, नगरसेवक बजरंग लींबोरे साहेब, आबासेठ बरकसे, संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे,
शिंगवे - राहाता तालुक्यातील शिंगवे येथे तेली समाजाच्या वतीने शिंगवे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन निवेदन देण्यात आले.
सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.