सप्टेंबर, तेली गल्ली 2009
भोसरी :- भोसरी तेली समजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मयुरी पॅलेस मंगल कार्यालयात दिनांक २/८/२००९ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. दिलीप फलटणकर - पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळावरील सल्लागार व राष्ट्रपती पदक विजेते हे होते. लसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू जाधव - शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका
पिंपळगाव, ता वैजापूर (अॅडव्होकेट गणपतराव सावणे, गंगापूर ह्यांनी लिहिलेल्या मुळ चरित्रावरुन संक्षिप्त केलेले चरित्र)
प. पूज्य गोटीराम बाबा यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मौजे गाढे पिंपळगाव या खेडेगावीतेली समाजात झाला.
कुंभारात गोरोबा व एकोबा, माळ्यांत सावता, सोनारात नरहरी वगैरे इतर जातीमध्ये असे अनेक भगवद्भक्त होऊन गेले. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात नामदेवाचे समकालीन असे तेली ज्ञातीत "जोगा परमानंद'' हे भगवद्भक्त होऊन गेले. हा महापुरुष बहुतेक सर्व संतमालिकेत उल्लेखिलेला आहे. कारण हे तेराव्या शतकांत मोठे साधू व बऱ्याच वरच्या दर्जाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते.
सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.
गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली.