शिवाजी क्षिरसागर, अध्यक्ष सेवा आघाडी
माझी सर्व नोकरी पोलिस खात्यात गेलेली अनेक जबाबदार्या पेलताना माणुस वाचता आला, माणुस समजला. माझा समाज तेली, मी एक तेली ही भावना जीवनभर जपलेली. या वाटेवर तेली महासभा भेटली, मा. खासदार तडस साहेब भेटले. रामदासजी हे एक पैलवान पैलवान हे जरा तापट आसतात. पण विदर्भ केसरी असलेले हे बांधव अतिशय शांत स्वभावाचे मला त्यांच्या जवळ वावरता आले व काम ही करता येते हे त्यांचे वैशिष्ठ.
रमेश सदाशिव भोज
आपल्या झंझावती शैलीचा ठसा उमटविणारे रामदासजी तडस साहेब होय आम्ही त्यांना साहेबच म्हणतो कारण ते आमचे अगोदरही साहेबच होते आताही आहेत आणि भविष्यात अनंत कालापर्यंत साहेबच रहाणार आहेत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कारण पुर्वीनपासुनच त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशाी आहेत. ते आपल्या समाजात जन्मले हे आपल्या समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल, त्यांचा परिसस्पर्शा समाजाला झाला आणि संपुर्ण तेली समाजाचे भाग्यच उजाळले असे म्हणण्यातकाहीच वावगे ठरणार नाही. स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करून अनेक समाज बांधवांना त्यांनी सर्व प्रकारची मदतच केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या तेली समाजाचे नाव संपुर्ण देशात सध्यातरी निघत आहे. यांच्यामुळेच आपला समाज नावारूपाला आलेला आहे. त्याचे कारण म्हणजेच साहेबांचे आपल्या समाजावरील प्रेम त्यांचे आशिर्वाद त्यांचे सहकार्य.
प्रा. वसंतराव कर्डिले, प्रधान संपादक तेली समाज सेवक
इ.स. २०१३ च्या मध्यापासुनच २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे नेतृत्व नव्या दमाचे नरेंद्र मोदी करणारे हे स्पष्ट झाले भाजपाचे अनेक बुजुर्ग व पेपर टायगर नेते नाराज झाले तरी मोदीच्या प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला होता. अशा स्थितीत नांदेडचे चिंतन शिबीरे संपवुन एका कार्यक्रमासाठी आम्ही यवतमाळाला आलो तेथे तडसाची गाठ पडली तेथे मी गजुननाना, प्रिया महिंद्रे, डॉ. भुषण कर्डिले व बाकीच्यनी ह्या वेळी आपल्याला हजारो वर्षानंतर दिल्लीच्या राजगादीवर मोदीच्या रूपाने तेली बसवायचा आहे. त्यामुळे वर्धा मतदारसंघातुन खासदारकीसाठी तुम्हाला उभे राहावयाचे आहे.
मा. प्रांतीक तेली महासभा जि. भंडारा यांचे वतीने २६-८-१६ ला दु. १:३० वाजता जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सभा भंडारा जि. अध्यक्ष देवीदासजी लांजेवार यांचे वतीने आयोजित करण्यात आली. या वेळी दिप प्रज्वलीन राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. कृष्णरावजी हिंगणकर साहेब ,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ज. सेक्रेटरी मा. रामलालजी गुप्ता साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष युवक आघाडी चे सुखदेव वंजारी व गणमान्य उपस्थीीत होते
पुणे :- श्री. संत संताजी जगनाडे तेली समाज संस्था सुदूंबरे या मध्यवर्ती संस्थेेची कार्यकारणी सभा फुलगांव, ता. हवेली, येथील येवले फॉर्म हाऊस मध्ये संपन्न झाली सभेसाठी पुणे, चाकण, तळेगांव, ढमढेरे, आळे लोणावळा, नगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड अशा विविध परिसरातील समाज बांधव उपस्थीत होते.