ह. भ. प. कै. धोंडीबा राऊत, कै. दादा भगत, कै. शरद देशमाने, आश्रयदाते अर्जुनशेठ बरडकर या जाणत्या मंडळींनी पालखी सुरू केली. हे सर्वांना माहित आहेच परंतु या सुरूवातीच्या १ ले वर्षात जी धडपड झाली त्यावर पुढील प्रवास सुखकर झाला. यात राऊत बुवांची वणवण धडपड वृत्ती फार उपयोगी आली. दादा भगत हे एक जाणते होते. पुणे व पालखी मार्गावर नाते संबंध होते. त्या गोष्टीचा उपयोग त्यांनी इथे केला. त्यातून बरेच जन सहकार्यास समोर आले.
आता पालखीला भक्कम पाया लाभला होता. चालणार्या वारकर्यांच्या पायाखाली जी वाळू होती ती संपली. आता ती सरकण्याचा प्रश्नच नव्हता सर्वानी जुने वयोवृद्ध व्यवहारे मामांना जवळ घेतले. पालखीचा मोठा ध्वज त्यांच्याजवळ दिला. त्यांना झेंडेकर्याचा मान दिला सर्व बांधवांनी दर्शन घेतल्यानंतर पुणे सोडले तरी अनेक बांधव पालखीबरोबर वडकी नाल्यापर्यंत सोबतीला आले.
शरद देशमाने चांगल्याचा मान राखणारे. या मातीचा, या संस्कृतीचा, या इतिहासाचा, या तत्त्वांचा, ज्यांनी ज्यांनी मान राखण्यात आपलेपण विसरून मान राखला ते कदाचित याचमुळे या घराण्याला देशमाने हे नाव मिळाले असावे. आपले नाव सार्थक करणारे हे शब्द. देमशाने पोलिस खात्यातला माणूस. पण वृत्तीन धार्मिक व श्रद्धाळू ते पुढे निघाले
मार्गदर्शन मिळाले माहिती मिळाली आता यापुढे काय ? हा प्रश्न उत्तर न देता रोज सतावत होता. अशीच एक वेळ सुदुंबरे येथे कार्यकारिणीचा उत्सव कसा साजरा करावा या विषयी नेहमीप्रमाणे मीटिंग होती. ही बातमी समजताच राऊत इंदोरीहून सुदुंबर्यास गेले. मागील अनुभव जमेस असल्याने त्यांनी पालखीचा विषय या मिटींगमध्ये उपस्थित काही केला नाही
आपण पुढे होऊन पालखी सुरू कशी करावी. हा ध्यास लागला. लोणंदच्यापुढे जात असताना बरड येथे मुक्काम होता. बरड गाव छोटेच पण या गावात अर्जुनशेठ बरडकर ही धर्मात्मा असामी. हा एकटा माणूस लाखो माणसांना दोन्ही हातानी मदत करणार, वारकरी तृप्त होत. बरड येथे गेल्यावर अर्जुनशेठना सांगावे वाटले. पण कसे सांगावे आपण हे असे ! बरडकर हे असे ! त्यांना सांगावे, का न सांगावे याच विचारात सांगावयाचे राहून गेले.