Sant Santaji Maharaj Jagnade
समाजा विषयी तळमळ, त्याग व प्रेम आपण ठेवले तर समाज ही आपल्याला साथ सोबत देतो. आपल्या कामावर निष्ठा. सर्वांची मते जाणुण सर्वांना सोईस्कर निर्णय घेणे ही त्यांच्या कामाची पद्धत अनेकांची घडन करण्यास उपयुक्त ठरली आहे. मी एक तसा तैलिक समाज महासभेचा कार्यकर्ता. संघटनेने जबाबदारी दिली म्हणुन काम करू लागलो समाजाच्या कामा निमित्त त्यांना मंत्रालयात भेटण्यास प्रसंग आले. या वेळी संघटनेचा पदाधीकारी पेक्षा माझा समाज बांधव ही त्यांनी दिलेली वागणूक विसरता येत नाही. आलेला बांधव जेवला का ? नसेल तर जेवन करावयास चला ही त्यांची आपुलकी बरेच काही सांगुन जाते. मी तुमचा आहे. तुमच्यातील एक आहे. फक्त त्या मतदार संघातील आपल्या बांधवांनी मला समाज बांधव म्हणुन भरघेस मतदान केले हणुन मी खासदार झालो. ही त्यांची नम्रता पावलो पावली दिसते. ही जाणीव आजच्या बदलत्या जमान्यात सहज सापडत नाही. याहीपुढे जाऊन त्यांनी पुढचा पल्ला गाठला. खरे तर आम्ही त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. परंतु त्यांनी महाराष्ट्र मंत्री मंडळातील उपस्थीत असलेल्या काही मंत्र्यांची आमची ओळख करून ही दिली. यतुन माझा समाज बांधव कामा निमित्त आला तर त्यांना सहकार्य करा हा ही सल्ला दिला.
पश्चिम महारष्ट्रात समाजाची फार मोठी शोकांतिका आहे. गावाच्या शहराच्या मुख्य प्रवाहा पासुन नेतृत्व व कर्तृत्व बंदिस्त झाले. अशी वस्तुस्थीती असताना ही वाडा, नाने, पौड, राहु या हाताच्या बोटावर मोजले जावे आशा गावावर समाजाचा कायम स्वरूपी पकड आहे. त्या गावचा विकास तेली समाजाच्या घरातुन सुरू होतो. ही वास्तवता आज ही आहे. यातुन नेतृत्वाची मक्तेदारी तुम्ही जर आम्हाला दिली तर आम्ही गावाचा कारभार तुमच्या पेक्षा कणभर श्रेष्ठ करु शकतो.
वर्धा माझे माहेर पण अाता माहेर राहिलेलच नाही आम्ही दोघेच भाऊ बहिण, आई, बाबा, भाऊ, बहिणी सर्वच गेले त्यामुळे माहेरी कुणीच नाही पण माहेर या शब्दात खुप ओलावा प्रेम, सद्भाव, शक्ती सार काही समावलेल आणि हे माहेरपण अनुभवायला मिळालं रामदासजी तडस यांच्याकडे.
अनेक समस्यांनी ग्रस्त असलेलेव हजारो कोटींच्या कर्जाचा बोजा असलेले ऊर्जाखाते बावनकुळे यांनी अतिशय खंबीरपणे गेल्या दीड वर्षात प्रगतीपथावर नेऊन राज्यातील शेतकर्यांना, सामान्य ग्राहकांना व उद्ोजकांना चांगल्या स्वरूपात लाभ करून दिला आहे. मंत्री बावनकुळे यांनी सर्वसामान्यांची कामे तळमळीने व प्रमाणिकपणे तडीस नेली आहेत, त्यामुळेचतेली समाजाला बावनकुळे यांच्याबद्दल आदर आहे. घराच्या लोकांचा पाठींबा व कौतुकांची थाप पाठीवर असावी, जेणेकरून तेली समाजातील हे नेतृत्व आसेच दिवसेंदिवस राज्य व देश पातळीवर प्रगती पथावर रहावे ही सदिच्छा व्यक्त करून जिल्ह्यातील समस्त तेली समजातर्फे त्यांना कर्तृत्वाचे सन्मानपत्र देण्यात आले.
संघटक :- सौ. निलम अनिल घाटकर, मौर्यविहार, ओ/2, कोथरूड, पुणे - 38, मो. नं. 9890076851
आमच्या उत्कर्ष नावाची कन्या सन 2001 मध्ये उदयास आली. या कन्येचे पालक सुरूवातीला अवघ्या 15 महिला होत्या सुरूवातीला 200/- इतके पालकत्व मिळत होते. परंतु या उत्कर्ष भिशी मध्ये आता या कन्येचे पालकत्व स्विकारण्यासाठी रूपये 2000/ प्रति महिना असे झाले आहे. आता जवळ जवळ 50 महिलांनी पालकत्व स्विकारले आहे. या मध्ये कोथरूड, कर्वेनगर, वारजे या भागातील महिला सहभागी झालेल्या आहेत. दरमहिन्याच्या 10 तारखेला उत्कर्ष महिला भिशी वाढदिवसा निमित्त भिश फोडली जाते.