पौड मध्ये घराचे छप्पर डळमळीत झाले. पावसाळ्यातील पाऊसाच्या झडीत ते अधीक मेटाकुटीस येत होते. घर चालवणेच जिकेरीस येत आसे. यातुनही हा चि. अनंत वाचकवडे एम.ए. झाला. सुशिक्षीत बेकार्यांंच्या तांड्यातील एक घटक झाला. या तांड्यात वावरण्यापेक्षा परस्थीतीवर मात करावी नुसते रडगाणे गात बसण्यापेक्षा हात पायांना गती द्यावी या साठी इंदापूर येथे शिंदे आत्याकडे गेला. या ठिकाणी अत्याभावाकडे थांबला. गेली 50 वर्ष इंदापूर शहराला जीवन फोटो स्टुडीओ चांगलाच परिचीत.
ते एवढ्यावर स्थीर राहिले नाहीतर वाडा गावच्या ग्रामपंचायतीचे सलग दहा वर्ष ग्रा. पं. सदस्य ही राहिले आहे. भिमा शंकर गणेश मंडळाचे ते खजिनदार म्हणुन कार्यरथ आहेत. भिमा शंकर ग्रा. वि. स. पत संस्थेचे संचालक म्हणुन गावाचा विकास साध्य करित आहेत. खेड येथील जेष्ठ बांधव श्री. सत्यवान शेठ कहाणे, श्री. प्रदिप कर्पे, श्री. अनिल कहाणे यांच्या संपर्कात राहिल्या मुळे एक वेगळी विचाराची बैठक तयार झालेली. खेड तालुका तेली महासभा, पुणे जिल्हा पश्चिम तेली महासभा या संघटनेच्या उभारणीच्या कामात सहभाग यातुन सामाजीक जाणीव बळावत गेलेली.
ह. भ. प. कै. धोंडीबा राऊत, कै. दादा भगत, कै. शरद देशमाने, आश्रयदाते अर्जुनशेठ बरडकर या जाणत्या मंडळींनी पालखी सुरू केली. हे सर्वांना माहित आहेच परंतु या सुरूवातीच्या १ ले वर्षात जी धडपड झाली त्यावर पुढील प्रवास सुखकर झाला. यात राऊत बुवांची वणवण धडपड वृत्ती फार उपयोगी आली. दादा भगत हे एक जाणते होते. पुणे व पालखी मार्गावर नाते संबंध होते. त्या गोष्टीचा उपयोग त्यांनी इथे केला. त्यातून बरेच जन सहकार्यास समोर आले.
आता पालखीला भक्कम पाया लाभला होता. चालणार्या वारकर्यांच्या पायाखाली जी वाळू होती ती संपली. आता ती सरकण्याचा प्रश्नच नव्हता सर्वानी जुने वयोवृद्ध व्यवहारे मामांना जवळ घेतले. पालखीचा मोठा ध्वज त्यांच्याजवळ दिला. त्यांना झेंडेकर्याचा मान दिला सर्व बांधवांनी दर्शन घेतल्यानंतर पुणे सोडले तरी अनेक बांधव पालखीबरोबर वडकी नाल्यापर्यंत सोबतीला आले.
शरद देशमाने चांगल्याचा मान राखणारे. या मातीचा, या संस्कृतीचा, या इतिहासाचा, या तत्त्वांचा, ज्यांनी ज्यांनी मान राखण्यात आपलेपण विसरून मान राखला ते कदाचित याचमुळे या घराण्याला देशमाने हे नाव मिळाले असावे. आपले नाव सार्थक करणारे हे शब्द. देमशाने पोलिस खात्यातला माणूस. पण वृत्तीन धार्मिक व श्रद्धाळू ते पुढे निघाले