Sant Santaji Maharaj Jagnade
नागपुर तेली समाज सामूहिक विवाह समितीच्या कार्यालयाचे उद्घाटनकरण्यात आले यावेळी तेली समाजाचे बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश भाऊ गिरडे, शेखर भाऊ सावरबांधे, रामुजी वानखेडे, अभिजीतजी वंजारी ,पुरुषोत्तमजी घाटोल, मोहन आगाशे इतर पदाधिकारी व समाजाचे नेते समाज कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते
अमरावती जिल्हा राठोड तेली समाज मंडळ द्वारा संचालित श्री संताजी भवनाचे वास्तु पुजन व श्री संताजी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा तथा भवनाचे उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. 05/02/2018 ते मंगळवार दि. 06/02/2018, स्थळ श्री संताजी भवन, हॉटेल लॉर्डस च्या बाजुला, एम. आ. डी.सी रोड, उषा कॉलनी, अमरावती (महा.) येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप
अमरावती तिवसा तेली समाज : येथिल समाज संघटनेच्या वतीने समाज बाधंधवांनी नगरपंचायत परिसरात संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व हारार्पण करून प्रसादाचे वाटप केले. संताजींचा लयघोष करीत एक स्टॉल लावून नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप करण्यात आले.
नागपुर - श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाजातील फार मोठे महान संत होते. त्यांनी स्वतः संत तुकारामांच्या अभंग गाथा स्वहस्ते लिहून त्यांचे रक्षण केले. त्यामुळेच आज सर्व विश्वामध्ये संत तुकारामांच्या अभंग गाथा आपण पाहू शकतो. या या अभंगात त्यांनी स्वतःच्या अचाट स्मरणशक्तीने लिहून काढल्या.
दिनांक 11/9/2016 रोजी मौदा येथील महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीची बैठक वृदावन लॉन येथे आयोजीत करन्यात आली या बैठकीला अध्यक्ष स्थानी प्रदेशचे सह-सचिव व प्रसिध्दी प्रमुख ईश्वरजी बाळबुधे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष सुखदेव वंजारी अखिल भारतीय तैलीक साहु महासभा युवक आघाडी