आता आपली जात कोणती ? ( भाग 1 )
महाराष्ट्राच्या पोटजाती विसरण्याची सुखात मी केली. मीच सगळा तेली समाज एका झेंड्या खाली आणला ही मोठे पणाची कमान मी लावली. पण पोटजाती विसरा एकजुट करा म्हणता म्हणता एक घोडचुक झाली. समोर समाज बांधव दिसले. त्यांच्या चेहर्यावरचा भाबडा विश्वास दिसला. खिाशात पैसा आहे, मिरवाईची हौस आहे. पद पाहिजे व त्यावर प्रतिष्ठा मिळते हे पद मिळवण्यासाठी कटपुतली सारखे जे उड्या मारतात.
महाराष्ट्राच्या जडण घडणीत देशाच्या सामाजीक, सांस्कृतीक विकासाचा दिशा दर्शक म्हणुन वर्धा जिल्हा ओळखला जातो ही ठेवण आज ही जपली जाते. या जिल्ह्याने माणुस घडवीण्याची प्रक्रिया सुरू केली. एक कष्टकरी घर एक शेतकरी घर, एक पैलवान घर आशा समान्य घरातील श्री. रामदास तडस कृषी उत्पन्न बाजार समीतीचे एक सदस्य म्हणुन राजकीय क्षेत्रात उमेदवारी सुरू करतात व आज वर्धा मतदार संघाचे खासदार म्हणुन निवडून जातात.
पुणे :- पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये या पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती ही सत्ता मिळविण्यासाठी मराठावादी काँग्रेसने बोगस ओबीसी निवडून आणले होते. मराठा समाजाच्या दडपशाहीला कंटाळलेल्या ओबीसींनी मोदींच्या बेगडी ओबीसीला मत दिले मुळात त्यांच्या विकासाला मत दिले होते. तळागाळात विकास होणार होता. यातुन जन्माने ब्राह्मण असलेले श्री. दवेंद्र फडणवीस मुळात ओबीसी मतावर सत्तेत गेले. पण यांनी सत्तेत जाऊन जे केले ते आता पहा. इतर मागास आयोगावर भ्रष्ट्रचारी व मराठा अभ्यास गटाचा संभाजी म्हसे बसविला. आणि आता मनपा निवडणूकी मध्य मराठा म्हणून जन्मलेले व पैशाावर ओबीसी झालेले आहेत. हाती आलेले निकाल फक्त मी मांडत आहेत.
हिंगणघाट तेली समाजाच्या संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाट दोरा तेली समाजातील सगळ्या शाखेच्या उपवर-वधू व पालकांचा परिचय मेळावा दिनांक 4 फेब्रुवारी 2018 रोजी वेळ-सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्थळ कलोडे सभागह हिंगणघाट ही आहे.
वाशिम - रिसोड येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रिसोड वाशिम शहरातील तेली समाज बांधवांतर्फे अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांच्या पालखी सोहळा साजरा करण्यात आला.