Sant Santaji Maharaj Jagnade
माजीमंत्री जयदत्त क्षिरसागरसह दिग्गजांची उपस्थिती
अमरावती :- अमरावती जिल्हा तैलिक समितीतर्फे आयोजीत विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुला- मुलींच्या परिचय महामेळाव्याचे भव्य आयोजन व कुर्यात सदा मंगलम पुस्तिकेचे प्रकाशन 17 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजीमंत्री आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते केले जाईल.
तेली विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप-वर वधु परिचय मेळावा रविवार दि.३१ डिसेंबर २०१७ सकळी १०.०० वाजता, तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकातील अथवा मित्रपरिवारातील कोणी लग्नाचे वधू-वर असतील तर कळवा. आम्ही त्यांचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करु फॉर्म देण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१७ ही आहे.परिचय पुस्तिकेसाठी उप-वधु,वरांची माहिती(फाँर्मची झेरॉक्स चालेल)
हिवरखेड येथे तेलि समाज बांधवाचा वतीने संत संताजी महाराज जयंती निमित्ताने हिवरखेड पार्थमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ फ्रुड वाटप करण्यात आले व महाराजाच्या चरित्रावर प्रकाश टाकून संताजी महाराजांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी उपस्थित हिवरखेड चे ठाणेदार देवरे साहेब,दुययम ठणेदारभस्मे साहेब,गवई साहेब,तंटामुक्ती अधक्ष्य नंदकिशोर चॉबे,तसेच समाज बांधव राजेश पांडव, साहेबराव बेलूरकार,दिलीप नाचने,पवन गावत्रे,अंकुश निळे,अजिक्य पांडव,आदित्य पांडव,तसेच डॉ, सोळंके,डॉ दारोकार,व पत्रकार बंधू धीरज बजाज,सूरज चॉबे ,मानके,अर्जुन खिरोडकार हे होते,,,
उस्मानाबाद-आज दि.६ रोजी शासकिय विश्रामगृह येथे तेली समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यातिथी साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.हि पुण्यातिथी प्रथम वर्ष असल्या कारणाने श्री मुकुंद कोरे महाराज यांच्या निवास्थानी करण्याचे ठरले.संताजी जगनाडे महाराजांच्या दि.१५ रोजी पुण्यातिथी दिवशी मुकबधीर अपंग मुलांना खाऊ वाटप करण्याचे व गरजु विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.
अमरावती दि.26:11:2017 रोजी पहील्यांदाच, अमरावती तिवसा शहरात तेली समाज मिलन मेळावा आयोजीत केला होता. या कार्यक्रमासाठी तिवसा शहरातील संपूर्ण तेली बांधवांनी उपस्थिति दाखवुन संपुर्न कार्यकर्त्यांच मन जिंकले होते. या कार्यक्रमासाठी तेली सामाजातील दिग्गज लोकांनी उपस्थिति दाखवीली त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.