Sant Santaji Maharaj Jagnade
मूक मोर्चा चलो अकोला. दोंडाईचा येथे तेली समाजाच्या 5 वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व शाखीय तेली समाजाचा अकोला येथे मूक निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिवसा तेली समाज धडकला तहसील कार्यलयावर तिवसा शहरातील अनेक संघटनांनी दिले समर्थन. धुळे जिल्ह्यातील दोन्डाई शहरात नूतन महाविद्यालयत तेली समाजातील 6 वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करुण त्या कुटुंबावर दबाव टाकन्याचा निषेधार्त व असा प्रकार कोणत्याच समाजात घडू नये यासाठी तहसीलदार साहेबांना दिले निवेदन.
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकिय विश्रामगृह येथे २४ रोजी दुपारी २ वाजता संपन्न झाली या बैठकिस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके जिल्हा सचिव अँड विशाल साखरे कोषाध्यक्ष महादेव मेंगले कार्यकारणी सदस्य लक्ष्मन निर्मळे,राजाभाऊ देशमाने, मंगेश जवादे,रमेश साखरे,महादेव राऊत
मुर्तिजापूर : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा मूर्तीजापूर तेली समाज संताजी सेना मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परभणी. धुळे जिल्हातील दोंडाईचा येथील शाळेत एका पाच वर्षाच्या बालीकेवर दि 8 फेब्रुवारी 2018 रोजी ती बालीका शाळेत गेली आसता एका व्यक्ती ने तीला आमीष देत तीच्यावर अत्याचार केला. त्रासाबाबद तीने आईला सांगितले. त्यांनी डाँक्टर कडे नेले आसता तीच्यावर अत्याचार झाल्याचे चे ऊघड झाले.