भुसावळ - तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुसावळात तेली समाजातर्फे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची प्रतिमा व शासननिर्णयाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.
श्री. संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा, पैठण तर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त विविध पैठण येथील विविध शासकीय कार्यालयाना श्री. संत संताजी महाराज जगानाडे यांची प्रतिमा व श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याच्या जिआर ची शाासकीय प्रत देण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष विक्रम हरिभाऊ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ दादाराव सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव नाथुजी बरकसे, सचिव भगवान कोंडीराम मिटकर तसेच इतर कार्यकर्ते देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8. डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण मंडळ कार्यालय चिंचवड या ठिकाणी तेली समाजाच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली
रावेर - शासकीय कार्यालयांत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. यासंदर्भात नगरसेवक अॅड. सूरज चौधरी यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले.
सन 2019 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि 8 डिसेंबर 2019 रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.2218/प्र.क्र.195//29 दि.26 डिसेंबर 2018 परिपत्र काढण्यात आले आहे