श्री संताजी महाराज जयंती उत्सवाचा पावन पर्वावर संताजी बिग्रेड तेली समाज महासभा महा. राज्य नागपूर यांच्या सहकार्याने आयोजीत भव्य बाईक रॅली व महाप्रसाद रविवार दि.८ डिसेंबर, २०१९ ला सकाळी ९.३० वाजता स्थळ : पारडी हनुमान मंदीर भंडारा रोड, नागपुर. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा श्री संत संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी भव्य बाईक रैलीचे आयोजन पारडी हनमान मंदिर ते ते नंदनवन जगनाडे चौक पर्यंत केले आहे
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संत संताजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यावेळी उपस्थित अध्यक्ष सुभाष हाडके, उपाध्यक्ष मनोज विभुते, सचिव प्रमोद दळवी व मा. अनिल भोज, मा.अनिल क्षीरसागर, मा. संजय भोज, अशोक भोज, दिलीप भोज, रघुनाथ दळवी, विठ्ठल क्षीरसागर, संतोष किर्वे, संतोष क्षीरसागर हे सभासद व समाज बांधव उपस्थित होते.
तिळवण तेली समाजाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेली समाज पुणे शहर अध्यक्ष घनशाम वाळुजकर, कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव सचिन नगिने, विश्वस्त प्रवीण बारमुख, पतित पावन संघटनेचे खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर, तिळवण समाजाचे प्रकाश कोकणे, हेमंत भोज, सुरेश शिंदे, अमोल शिंदे उपस्थित होते.
वर्धा: शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केलेली आहे. या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती 08 डिसेंबर 2019 रोजी साजरी करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मान्यता दिल्याने या वर्षीपासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे साजरी करण्यात येणार आहे.
किल्ले धारुर येथील नगर परिषद येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज याची जयंती साजरी करताना किल्ले धारुर नगरीचे नगराध्यक्ष आदरनीय डाॕ. स्वरूप सिंह हजारी साहेब नगरसेवक बाळासाहेब सोनटटक्के नागनाथ सोनटक्के सोमनाथ भालेराव माहारुद्र ईःगळे सर दत्ताबोरगावकर जगन्नाथ सोनटक्के गंगाधरशिंदे ज्ञानेश्वर शिंदे बालासाहेब बोरगावकर