एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 3 )
1905 साली दुसर्या प्लेग मध्ये रावसाहेबांचे मोठे बंधू भाऊसाहेब वारले. त्याआधीच्या प्लेग मध्ये रामचंद्र वारले . वाताहत झाली. सावकाराने घरे ताब्यात घेतली. 1906 साली रावसाहेब शंकर रामचंद्र नगरहून पुण्याला आले. एका कार्नेलिया नावाचा युरोपियन हॉटेलात त्याने 20 रुपये पगारावर नौकरी केली. नौकरी करून भांडवल जमवले आणि ते जुने फर्निचर विकत घेऊ लागले. नौकरी वरून आल्यावर फर्निचर दुरुस्त करीत आणि जुन्या बाजारात रविवारी व बुधवारी विकून येत.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 2 )
अक्षरे गिरवावित आशा वेळी प्लेग व घराला अडचणींचा डोंगर मिळालेला. प्लेग जाताच ते शाळेत जावु लागले. उर्दु व मराठी शाळा होती. तेथे जमेना मग काही जण घरगुती शाळा चालवत होते तिकडे गेले. शाळा दोन तीन झाल्या पण शिक्षण फक्त इयत्ता तिसरीतच थांबले. या शाळे पेक्षा पोटाचा प्रश्न मोठा होता. या पुस्तकी शिक्षाणा पेक्षा बाहेरिल जगाची शाळा पोटाचा प्रश्न सोडवु शकते. त्यांनी व्यवसायात लक्ष दिले. पण लगेच परत प्लेगने आपली पाऊले पुण्यात भक्कम रोवली.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 1 )
ज्या त्या काळात आपल्या कर्तुत्वाने काहींनी सुर्यच कवेत घेतला होता तो घेताना पोळले, भाजले, तडफले पण सुर्या जवळ जाऊन तो सुर्य प्रकाश चारही दिशेला पोहच करणारी दुर दृष्टी असलेल्या काही महान व्यक्ती त्या काळात होऊन जातात. त्यांच्या कार्याचा आदर्श हा शेकडो वर्ष नंदादिप आसतो. तो तेवत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आसते. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ही एक असामान्य व्यक्तीमत्व. त्यांच्या जीवन कार्याचा शोध व बोध.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे श्री संत तुकाराम गाथेचे लेखक श्री संताजी महाराज जगनाड़े यांच्या जयंती निमित्त श्री संताजी महाराज मंदिर श्रीक्षेत्र पैठण येथे श्री संताजी महाराजांचे पुजन सायं.५.०० वा. खालील मान्यवरांच्या शुभहस्ते पुजन होईल. मा. श्री. संदिपान पा.भुमरे साहेब आमदार, पैठण श्री. सुरज लोळगे नगराध्यक्ष न.प.पैठण श्री. भारस्कर साहेब तहसिलदार, पैठण श्री. भास्कर तात्या कावसनकर गटविकास अधिकारी पंचायत समिती, पैठण
भारतीय इतिहासातला संत परंपरा फार पुरातन काळापासून ज्ञात आहे श्री वेद व्यासपासून ज्ञानेश्वर,तुकाराम,तुळशीदास, नानकदेव,सावता माळी,संतगोरा कुंभार आणि चोखामेळा या ज्ञात अज्ञात आशा अनेक संत महापुरुष आणि समाजाच्या उत्कर्षासाठी देह झिजवला. या महान संतांनी भारत वर्षात झाला समाज रचना प्राण म्हणता येईल अशी नैतिक मूल्य समाजासाठी निकोप वाढीसाठी रुजविली जोपासली व वाढीस लावली अशी नैतिकता समाजाच्या सर्वच पातळ्यांवर संतच वाढवतात.