Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशिय संस्था, गडचिरोली, गडचिरोली आयोजीत महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा गडचिरोली जिल्हा, विदर्भ तेली समाज महासंघ, गडचिरोली, संताजी सोशल मंडळ, गडचिरोली, व तेली समाज, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने, श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव व विदर्भ स्तरीय उप वर-वधू परिचय मेळावा, दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोज रविवारला सकाळी ठिक ११.०० वाजता स्थळ : सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली
संताजी स्नेही मंडळ, तालुका चामोर्शी चे वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती, निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम, दिनांक 0८ डिसेंबर २०१९ (रविवार) दुपारी १.०० वाजता, स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी, अध्यक्ष - मान. प्रा. विलास निंबोरकर, गडचिरोली, प्रमुख वक्ते मान. प्रविनदादा देशमुख, सुप्रसिद्ध वक्ते, यवतमाळ (विषय : शेतीचे अर्थकारण, सरकारी धोरण व ओबीसी आरक्षण), किर्तनकार मान. इंजि. भाऊसाहेब थुटे , प्रसिद्ध प्रबोधनकार तथा सप्तखंजेरी वादक, वर्धा (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)
धुळे शासकीय आदेशानुसार तेली समाजाचे आराध्य दैवत थोर संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर खानदेश तेली समाज मंडळातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना भेट दिली. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत श्री. संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असणे आवश्यक आहे.
अमरावती तेली समाज श्री संताजी समाज विकास संस्था वधु वर फॉर्म, सदर वधु वर फॉर्म तेली समाजातील वधुवर पालकानी भरून संपर्क कार्यालय डॉ. विजय अजमिरे , मंगल कार्यालय रोड, पवार ड्रायव्हींग जवळ, जोगळेकर प्लॉट, अमरावती येथे पाठवाव अशाी विनंती संस्थे तर्फे करण्यात आलेली आहे.
तेली समाज मेळाव्यात पाच विवाह जुळले १९०५ युवक-युवतींनी दिला परिचय : सुचीचे प्रकाशनजळगाव संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित तेली समाज वधुवर मेळाव्यात १९०५ युवक-युवतींनी परिच्य करून दिला.दरम्यान,मेळाव्यात पाच विवाह जुळले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधुवर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. पुष्पमती गुळवे हायस्कूल व्या प्रांगणात आयोजित मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणाव चे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी हे होते.