Sant Santaji Maharaj Jagnade
अमरावती जिल्हा राठोड तेली समाज मंडळ द्वारा संचालित श्री संताजी भवनाचे वास्तु पुजन व श्री संताजी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा तथा भवनाचे उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. 05/02/2018 ते मंगळवार दि. 06/02/2018, स्थळ श्री संताजी भवन, हॉटेल लॉर्डस च्या बाजुला, एम. आ. डी.सी रोड, उषा कॉलनी, अमरावती (महा.) येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे आयोजित तेली समाज वार्षिक स्नेहसंमेलन - २०१८ रविवार, दि. ४ फेब्रुवारी, २०१८ दुपारी ०४:३० ते ०७:०० वाजेपर्यंत सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी रोड, ठाणे (प) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
सावजी तेली समाज स्नेह मंडळ अकोला द्वारा आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन 2018 संपन्न झाले. यावेळी तेली समाजाचे आराध़्य दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रितिमा पुजनां व दिप प्रज्वलनांने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
चंदन नगर, येरवडा, वडगावशेरी, विमाननगर, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, वाघोली, फुलगाव, येथील तेली समाजातील बंधू-भगिनींसाठी तिळगुळ, हळदीकुंकू व विद्यार्थी गुणगौरव स्नेह भोजन समारंभ रविवार दिनांक 28-1- 2018 रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळी आयोजित आलेला आहे.
पुसद विभागीय तेली समाज पुसद व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा द्वारा आयोजित
पुसद राज्यस्तरीय तेली समाज वधु वर परिचय मेळावा
रविवार दिनांक 8 मार्च 2018 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ - गणोबा मंगल कार्यालय माहूर रोड पुसद जिल्हा यवतमाळ
पुसद विभागातील तेली समाजाने तेली समाज विवाह मेळावा व पुसत विभागीय तेली समाज वधू-वर परिचय मेळावा असे अनेक भव्य दिव्य कार्यक्रम यापूर्वी संबंध केलेले आहेत.