Sant Santaji Maharaj Jagnade
स्वातंत्र्य लयास घालवतांना बर्वे नावाच्या व्यक्तीने स्वराज्याचा ध्वज उतरवुन युनियन जॅक फडकवला. सातरच्या गादीवर लक्ष देण्यास याच बर्वेंना पाठविले. काही वर्षात छत्रपतींना देशो धडीस लावणारे हेच बर्वे होते. हा इतिहास आहे. तो कोणत्याच शालेय अभ्यासक्रमात येऊ दिला जात नाही. हे का मांडायचे तर या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भिल्ल, सोनार, रामोशी, कोळी या मंडळींनी पेशवाई संपुष्टात येताच प्रखर लढा दिला. यातील हजारो जनांना गोळ्यांच्या वर्षावात मरण इंग्रजांनी दिले. त्यांचा ही इतिहास कुठे शिकवला जात नाही. संत संताजी, नमाजी माळी, गवार शेठ या सारख्या मंडळींनी संत तुकोबा बरोबर राहून शिवराया साठी ही भुमी अनकुल केली. परंतु इतिहासाची फारकत घेऊन संत रामदासांना शिवरायांचे गुरु बिंबवले जाते.
पुणे - महाराष्ट्र तैलीक महासभा ही गट, तट, भेद, हेकेखोर यात न गुंतता ती समाजाची रक्त वाहिनी बनावी या साठी तेली गल्ली मासिकाने विपुल लेखन केले. कारण ही समाजाची संघटना आहे. ती दुफळीत गुंतून समाजाचे नुकसान होऊ नये म्हणुन चांगल्या बाबींचे कौतुक व चुकांचा पंचनामा मांडला. काही सुज्ञ मंडळींनी ही आपले विचार इतर प्रसार माध्यमातुन मांडले. त्याला चांगले फळ येऊ लागले. समाजातील जेष्ठ बांधवांची सह विचार सभा मुंबई येथे संपन्न झाली. या ठिकाणी समाजात दुफळी होऊ नये म्हणुन मते मांडून त्या बाबत निर्णय प्रक्रिया सुरू झाली. त्या ठिकाण उपस्थीत असलेल्या मा. सौ. प्रिया महिंद्रे यांनी दिली. कारण तेली गल्ली हे मासीक हे शक्य तो संतुलन साधण्याचा प्रमाणिक प्रयत्न करते. कदाचीत आमची चुक असेल तर कळवा त्या विचारांना ही प्रसिद्धी देऊ.
नेवासा - येथिल अडत व्यापारी श्री. देवीदास सदाशीव साळुंखे यांची भानस हिवरेया ग्रा. पं. मध्ये नुकतीच निवड झाली आहे. नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर संचालक म्हणुन आमदारांनी शिफारस केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड मार्केट कमिटीवर केली आहे. या पुर्वी या मार्केट कमीटीच व्हाईस चेअरमन ही होते. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
चाकण :- समाज संघटन करून नेतृत्व साकारलेल्या सौ. निता करपे यांची निवड श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नुकतीच त्यांची निवड झाली.

या शिक्षणातून एवढेच शिकले की सत्तेत जायचे तर पहिला आपल्या तेली, माळी, सुतार, कुंभार, नाभीक, परिट या आपल्या जाती पाहिजेत. त्याच बळावर अर्थीक बलवान असलेल्या मराठा समाजाची सोबत. ही सर्व जुळवा करून ते 2004 मध्ये ते वेल्हा ग्रामपंचायत सदस्य झाले. सर्वांना सोबत घेऊन पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवडले गेले. तेंव्हा त्यांनी जि.प. चे नियम व निधी यांचा अभ्यास केला. मला मिळालेल्या या संधीचा लाभ माझ्या गटात गेला पाहिजे. डोंगरी विकासाचा निधी वाड्या वस्त्यावर घेऊन जाण्यात त्यांनी आघाडी घेतली.