भोपाल । तेली समाज की एकता के लिए सभी संगठन एकजुट हो गए हैं और उनके नेताओं ने मिलकर 2 अप्रैल की भोपाल रैली को सफल बनाने के लिए कमर कस ली है। उल्लेखनीय है कि हाल ही में भोपाल के इलेवन हाइट्स होटल में तेली साहू राठौर समाज के विभिन्न संगठनो के प्रदेश अध्यक्ष एवं वरिष्ठ पधादिकारियो की महत्वपूर्ण बैठक सम्पन्न हुई।
इंदिरानगर दि. १४ - विद्यमान सरकारने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या सुदुंबरे येथील समाधी स्थळाला अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांच्या निधीची व नागपूर येथील संताजी महाराज आर्ट गॅलरीसाठी सहा कोटी रुपये निधीची तरतूद केली. समाज जोडो अभियान व ओबीसी लढ्यासाठी काढलेल्या रथयात्रा याचा प्रभावी परिणाम या अर्थसंकल्पात झळकला.
हिंदू नववर्ष गुढीपाडवा हा उत्सव महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. ठाणे महानगरातील तेली समाजाने वर्ष २०२३ सालच्या गुढीपाडव्याच्या उत्सवाच्या स्वागत सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती केली आहे. या सोहळ्याची तारीख बुधवार, दि. २२ मार्च २०२३ आहे आणि सकाळी ६.३० वाजता तलावपाळी येथे सोहळा साजरा केला जाईल.
प्रवास: गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याचा योग्य आला. त्यादरम्यान अनेक कुटुंबे व सामाजिक संबंध असणाऱ्या काही जाणकार व्यक्तींची भेट झाली. प्रत्येक गावात सरासरी १०० हून अधिक मुले व मुली ३०-३५ वय ओलांडले तरीही विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
नाशिक, सिडको, - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक महानगरची बैठक इंदिरानगर येथील संताजी जगनाडे महाराज हॉल येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगराध्यक्ष सागर कर्पे तर प्रमुख पाहुणे म्हणून महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, विभागीय अध्यक्ष अॅड. शशिकांत व्यवहारे, प्रदेश सहसचिव जयेश बागडे उपस्थित होते.