Sant Santaji Maharaj Jagnade
अमरावती - मिस इंडिया वॉशिंग्टन 2017 ची सौंदर्यस्पर्धा सिएटल (वॉशिंगटन ) अमेरिका येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विदर्भकन्या अमरावतीची चैताली हिने भाग घेऊन मिस इंडिया सिएटल - वॉशिंग्अ चा खिताब पटकावला. त्याबरोबरच तिने डिप्रेशन ह्यूमन विइंग खा खिताब पटकावला. त्या बरोबरच तिने डिप्रेशन इन ह्यूमन विइंग या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर करून परीक्षक, स्पर्धक व प्रेक्षकांची मने जिंकली, त्यामुळे अॅलेंट कॅटेगरीचा विशेष पुरस्कारसुद्धा तिला प्राप्त झाला.
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा उत्तर नागपुर के उपाध्यक्ष राकेश ईखार इनको जन्मदिन की शुभकामनाए देते हुए एव संताजी जगनाडे महाराज का तैलचित्र भेट देते हुए तेली समाज के पदाधिकारी गण.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
नागपुर - संत जगनाडे महाराजांनी संत तुकारामांची संपूर्ण गाथा त्यांच्या तल्लखबुद्धीने स्मरण करून लिहून काढली. त्यांनी समाजाला दिलेली ही मोठीच देणगी आहे. अशा समाज संतांचे उत्कृष्ट स्मारक साकारण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गडचिरोली - संपूर्ण भारतभर विखुरलेल्या तेली या जातीला व विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी व तेली जातीला जाणून - बुजून आरक्षणापासून डावलण्यात आले आहे. धुंदीसाठी पोकळ आश्वासनेच आपल्या समाजाला देऊन सर्वांची दिशाभूल केली आहे. एवढेच नाही, तर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ओबीसी व तेली समाजाला स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही न्याय मिळाली नाही, हेच आमचे सर्वात मोठे दुर्देव आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष तथा खा. रामदास तडस यांनी केले.
आज दि. ८/१२/२०१७ ला मौजा सोनापूर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करून त्यानिमित्य आदरांजली वाहीण्यात आली. याप्रसंगी गावातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.